गोरक्षकांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी ; धुळ्यात उस्फुर्तपणे बंद

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – हिंदू देव-देवतांच्या बदनामीसह गोरक्षकांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारी मालेगाव रोड वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात येऊन कडकडीत बंदही पाळण्यात आला. आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरात आरती करण्यात येऊन मोर्चाची सांगता झाली.

देवतांची बदनामी करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसेच यापूर्वी गोरक्षकावर हल्ला करण्यात आला होता. या सर्व घटनांमुळे तरुण वर्गात संतापाची लाट निर्माण झाली आहे. पोलिसांकडून विशिष्ट समाजाला टार्गेट करून त्यांच्यावर दबाव टाकणे, गुन्ह दाखल करणे आदी प्रकार करून दडपशाही केली जात आहे. रविवारी झालेल्या बैठकीत शहर बंदची हाक देण्यात आली होती. आवाहनानंतर सोमवारी सकाळी १० वाजता मनोहर टॉकीजसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शांततेत मोर्चा काढण्यात आला. पाचकंदिल येथे सामूहिक हनुमान चालिसा पठण झाले. त्यानंतर आग्रारोडवरील श्रीराम मंदिरात सामूहिक आरती झाल्यानंतर मोर्चाचा शांततेत समारोप झाला.

यावेळी कुठला हि अनुचित प्रकार घडु नये यासाठी नाशिक ग्रामीण दंगा काबू पथक, नंदुरबार अप्पर पोलीस अधिकारी चंद्रकांत गवळी व पोलीस कर्मचारी, जळगाव पोलीस अधिकारी, कर्मचारी, एस. आर. पी. बल गट क्रं. ६ च्या तीन तुकड्या असा जादाचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरातील आग्रारोड, मुख्य बाजार पेठ, पाच कंदील, पारोळा रोड, साक्रीरोड, कुमारनगर, देवपुरातील व्यापाऱ्यांनी दुकाने, व्यवसाय बंद ठेवून मोर्चाला पाठिंबा दिला होता.

आरोग्यविषयक वृत्त

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू 

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ 

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे 

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार 

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ 

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या 

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून 

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने