नीरेतील दुकान फोडणारा अट्टल सराईत गुन्हेगार चंद्रकांत लोखंडेसह साथीदाराला अटक

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन  –   नीरा (ता.पुरंदर) येथील व्ही. एन.एस. सीटी या अपार्टमेंटमधील अमेझॉन कुरियर चे दुकान चोरट्यांनी लुटून ७७ हजार ४९९ रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता. यातील मुख्य आरोपी चंद्रकांत लोखंडे हा जबरी चोरी,चैन स्नेचिंग असे गंभीर गुन्हे करणारा अट्टल सराईत गुन्हेगार असून त्याला व त्याच्या साथीदाराच्या मुसक्या आवळण्यास पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

नीरा (ता.पुरंदर ) येथील अँँमेझॉन कुरियरचे दुकान २६ सप्टेंबर ला फोडल्यानंतर जेजुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींचा शोध घेत असताना आरोपी चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे हा वाघळवाडी येथील घारे खानावळी जवळ येणार असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यावर सापळा लावून आरोपीला अटक करण्यात आली.

चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे (वय ३२ रा.ढवळ ता.फलटण जि. सातारा) श्याम शाशीराव मुळे (वय २०, रा.व्ही. एन. एस. सिटी – नीरा ता.पुरंदर जि. पुणे मुळ देवी अल्लाळे ता .निलंगा जि. लातूर ) यांना अटक करण्यात आली आहे. अँँमेझॉन कुरियर मधून चोरीस गेलेले तीन मोबाईल हॅंडसेट व इतर असा एकूण ७७ हजार ४९६ रुपये किंंमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. मुख्य आरोपी चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे यावर जबरी चोरी,चैन स्नेचिंग अशा स्वरूपाचे १४ गंभीर गुन्हे दाखल असून तो अट्टल सराईत गुन्हेगार आहे. सदर आरोपीची वैदकीय तपासणी करून जेजुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे
पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट , पी.एस.आय. अमोल गोरे,पोलिस हवालदार चंद्रकांत झेंडे ,पोलिस नाईक राजू मोमीन,पोलिस शिपाई अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, अक्षय नवले, मंगेश भगत , सहा. फौजदार जगताप, पो हवा. तांबे, पोलिस शिपाई अक्षय जावळे यांच्या पथकाने कारवाई केली.

पोलिस हवालदार चंद्रकांत झेंडे यांचे कौतुक

पोलिस हवालदार चंद्रकांत झेंडे हे यापुर्वी नीरा पोलिस दुरक्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांना या परिसरातील गुन्हेगारांची माहिती आहे. त्यामुळे सप्टेंबर २०१६ मध्ये गुळूंचेमधील दरोड्यातील आरोपी व आत्ता नीरा येथील दुकान लुटलेला सराईत आरोपी यांना गजाआड करण्यात महत्त्वाची भुमिका बजावल्याने पोलिस हवालदार चंद्रकांत झेंडे. यांचे कौतुक होत आहे.

You might also like