वाघा सीमेवर होणारी बीटिंग रिट्रीट ‘या’ कारणामुळे झाली रद्द 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना आज भारताला सोपवले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर अटारी-वाघा सीमेवर होणारी बीटिंग रिट्रीटचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. अटारी-वाघा सीमेवर दररोज बीटिंग रिट्रीट सोहळा पार पडतो. तो पाहणायसाठी भारतवासीय मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. सुरक्षेच्या करणास्तव आज बीटिंग रिट्रीट सोहळा होणार नाही.

अभिनंदन यांचे स्वागत करण्यासाठी हवाई दलाचे पथक अटारी येथे दाखल झाले आहे. अभिनंदन यांना वाघा सीमेतून भारताच्या स्वाधीन केले जाणार आहे. अभिनंदन यांच्या स्वागतासाठी देशभरातून लोक आज वाघा सीमेवर दाखल झाले आहेत. त्या ठिकणी पारंपरिक वाद्यांचा गजर करून जल्लोष केला जातो आहे. त्याच प्रमाणे लोकांच्या चेहऱ्यावर मोठा उत्साह पाहण्यास मिळतो आहे.

पाकिस्तानच्या विमानांना पिटाळून लावताना विंग कमांडर अभिनंदन यांचे विमान पाकिस्तानच्या सीमेत गेले. तेथेच पाकिस्तानच्या विमानासोबत झालेल्या संघर्षात अभिनंदन यांचे विमान जमिनीवर कोसळले. त्यावेळी पाकिस्तानी लष्कराने त्यांना अटक केली. त्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खान यांनी अभिनंदन यांना भारताच्या स्वाधीन करण्याची घोषणा केली. त्यानंतर आज त्यांना भारताच्या स्वाधीन केले जात आहे.