पुण्याच्या ग्राहकाकडून बारबालाच्या अपहरणाचा प्रयत्न 

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईमध्ये गेल्यावर ठराविक बारमध्ये जाणारा एक पुणेकर तेथील बारबालाच्या प्रेमात पडला. ती प्रतिसाद देत नाही, हे पाहिल्यावर त्याने तिच्या अपहरणाचा प्रयत्न केला. ही घटना नेरुळ येथे गुरुवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

काम संपल्यावर रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही बारबाला रिक्षातून घरी चालली होती. ती रिक्षात बसताच पाठोपाठ हा ग्राहक रिक्षात येऊन बसला व त्याच्या हातात चाकू होता. त्याने बारबालेच्या तोंडावर स्प्रे मारून रिक्षा चालकाला चाकूचा धाक दाखवण्यात आला.

दरम्यान, बारबालेने आरडा ओरडा केल्याने परिसरातील काही तरुणांनी रिक्षाचा पाठलाग करून तिची सुटका केली. त्यानंतर हा ग्राहक पळून गेला आहे. नेरुळ पोलीस अधिक तपास करत आहेत.