कोयत्याने सपासप वार करुन पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – घरगुती भांडणातून, घर सोडून गेलेल्या पतीने, दबा धरुन पत्नीवर कोयत्याने वार करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी सकाळी सहाच्या सुमारास कुदळवाडी चिखली येथे घडली. या प्रकरणी प्रदीप माधव आंबटवार (२५, रा. आलेगाव, ता. कंधार, जि. नांदेड) याने फिर्याद दिली. तर माधव गोविंद आंबटवार (६०) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुणाबाई आंबटवार असे जखमी महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप याचे वडील माधव याला दारूचे व्यसन आहे. तसेच तो कोणतेच काम करत नाही. यावरून आई अरुणाबाई आणि वडील माधव यांचे मागील एक महिन्यापूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून वडील माधव हे घर सोडून गेला होता. रविवारी सकाळी अचानक माधव घरी आला. त्यावेळी अरुणाबाई प्रात:विधीसाठी घराच्या खालच्या बाजूला जात होत्या. वाटेतच माधव दबा धरून बसला होता. माधव याने कोयत्यासारख्या हत्याराने अरुणाबाई यांच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर घातक वार करून जीवे ठार मारण्याच्या पर्यत केला.  चिखली पोलीस तपास करीत आहेत.

You might also like