पूर्ववैमनस्यातून चाकणमध्ये खुनाचा प्रयत्न

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – एक महिन्यांपूर्वी झालेल्या वादातून मोटारसायकलवरुन आलेल्या चौघांनी एकाला लाकडी दांडक्याने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी चाकण पोलिसांनी चौघा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

निलेश बागडे (रा़ मेदनकर वाडी, चाकण) असे गंभीर जखमी झालेल्यांचे नाव आहे. याप्रकरणी उमेश दिनकर सातव (वय २४,रा. चाकण) यांनी फिर्याद दिली आहे.

निलेश बगाडे व करुणा रामसिंग राजपूत (रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांच्यात वाद झाला होता. निलेश बगाडे हे गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता वाघेवस्ती येथून जात असताना मोटारसायकलवरुन चौघे जण आले. त्यांनी बगाडे यांच्या डोक्यात, तोंडावर लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. त्यात ते जबर जखमी झाले आहेत. याप्रकरणी चाकण पोलिसांनी चार अज्ञात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like