पोलिसात तक्रार दिल्याने मायलेकींच्या खुनाचा प्रयत्न

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिसात तक्रार दिल्याने दहा जणांच्या टोळक्याने घरात शिरुन तरुणी व तिच्या आईला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी निगडी पोलिसांनी दहा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

कैलास विटकर, अनिल शिंदे, अरुण जाधव, अजय शिंदे, सुनिता शिंदे, शीतल विटकर, सीमा बेलसरे, रेखा कांबळे, राणी कांबळे, समीर शेख अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. निगडी ओटा स्कीम येथील एका ५० वर्षाच्या महिलेने निगडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना निगडी येथील ओटास्कीम येथे गुरुवारी सायंकाळी घडली. या घटनेत दोघी मायलेकी गंभीर जखमी झाल्या आहेत.

या महिलेच्या मुलीने आरोपीविषयी पोलिसात तक्रार दिली होती. त्याचा राग धरुन आरोपी त्यांच्या घरात घुसले. दोघींना त्यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. या हाणामारीत आरोपी महिलांनी त्यांच्या अंगावरील कपडे फाडले. समीर शेख याने मी इलेक्ट्रॉनिक मिडियाचा पत्रकार आहे. तुमची एक मोठी न्यूज फ्लॅश करुन तुम्हाला सर्वांना येथून हाकलून देईन अशी धमकी देऊन या दोघींना जिवंत मारुन टाका, असे म्हणत इतरांना उत्तेजित केले. त्यामुळे कैलास विटकर याने हातातील लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केली.

आरोग्यविषयक वृत्त –

मधुमेह, मानसिक आजार आणि हृद्यरोगाला दूर ठेवण्यासाठी करा हे “प्राणायम” 

ह्रदयाची घ्या अशी काळजी , कधीही होणार नाहीत ब्लॉकेजेस …! 

आजपासून योगा करण्याचा संकल्प करणार असाल तर ‘या’ आसनांपासून करा सुरुवात 

गर्भधारने दरम्यान महिलांनी घ्या व्यायामाची अशी ” काळजी ”