जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी 6 जणांवर शिरूर पोलिसात गुन्हा दाखल

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर मधील रेणुका मंदिर परिसरात शालीनी पॕलेस सोसायटी लगतच्या आवारामध्ये दारू पिण्यासाठी बसून, येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांना पाहून हातवारे करत शिट्ट्या मारत असभ्य वर्तन करणार्‍या व्यक्तीला जाब विचारणाऱ्या सोसायटीमध्ये योगेश पडवळ याला जबर मारहाण, करून जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी सहा जणांवर शिरूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या मारहाणीत योगेश पडवळ राहणार रेणुका माता मंदिर हे गंभीर जखमी झाले आहेत. तर संतोष बोऱ्हाडे, गणेश भगवान बोऱ्हाडे, सुनिल घावटे, सोमनाथ बोऱ्हाडे, शिवा बोऱ्हाडे, व एक अनोळखी (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. बोऱ्हाडे मळा, शिरूर, जी.पुणे) यांच्यावर याबाबत जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे शिरुर रेणुका माता मंदिर परिसरातील शालीनी पॕलेस सोसायटी लगतच्या आवारात बारा तारखेच्या रात्री १०/१५च्या सुमारास काही व्यक्ती दारु पिण्यासाठी बसलेले असताना महिलेला पाहून हातवारे करून शिट्ट्या मारत असभ्य वर्तन करण्यात असल्याने एका महिलेने तात्काळ तिचा पतीस ही बाब सांगितली. त्यानंतर तात्काळ योगेश पडवळ यांनी खाली येऊन येथे सोसायटी आणि घरातील लोक फिरतात त्यांना ञास होते येथे बसून दारू पीत जावू नका. असे विचारले असता तु विचारणारा कोण असे म्हणत शिवीगाळी केली. तर संतोष बोऱ्हाडे याने पळत जावून स्फिप्ट कार मधून तलवार आणून मारहाण केली तर इतर साथीदारांनी दगड, राॕड, लाथाबुक्क्यांनी यांनी जबर मारहाण केली यात पडवळ यांना जबर मारहाण झाली पडवळ यांच्या वर खाजगी हाॕस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे.

या प्रकरणी संतोष बोऱ्हाडे, गणेश बोऱ्हाडे, सुनिल घावडे, सोमनाथ बोऱ्हाडे, शिवा बोऱ्हाडे यांच्या सह एका अनोळखी व्यक्ती विरोधात शिरुर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रविन खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलिस उपनिरीक्षक सुनिल मोटे करत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like