अनैतिक संबंधाचा संशय ! ‘त्यानं’ पत्नीच्या डोक्यातच घातली कुर्‍हाड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – अनैतिक संबंधाचा संशय घेतल्याने पतीने रागाच्या भरात झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून खुनाचा प्रयत्न केला. ही घटना चिंचवडमधील आनंदनगर झोपडपट्टीत गुरुवारी दुपारी घडली.

सारिका दत्ता धावरे (वय ३४, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड) या गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी हरिशचंद्र मच्छिद्र धावरे (वय ४०) याला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, सारिका आणि हरिशचंद्र धावरे हे पती पत्नी आहेत. गेल्या ४ महिन्यांपासून सारिका यांना आपले पती हरिशचंद्र यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यावरुन त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती.

१० ऑक्टोंबर रोजी दुपारी सव्वातीन वाजता सारिका या घरात झोपलेल्या असताना हरिशचंद्र याने घरातील कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यात वार करुन गंभीर जखमी केले. घरातील इतरांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेल्याने त्यांचा जीव वाचला. चिंचवड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन हरिशचंद्र धावरे याला अटक केली आहे.

Visit : Policenama.com