सिग्नल मध्ये बिघाड निर्माण करून दाेन एक्स्प्रेसगाड्या लुटण्याचा प्रयत्न

मिरज : पाेलीसनामा ऑनलाईन

सिग्नल मध्ये बिघाड निर्माण करून दाेन एक्स्प्रेस गाड्या लुटाऱ्याकडून लुचण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना मिरज-पुणे रेल्वे मार्गावर साल्पा अाणि आदरकी स्थानका जवळ घडली. काेल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस व लाेकमान्य टिळक टर्मिनस -हुबळी एक्स्प्रेस या दाेन रेल्वे गाड्या रविवारी मध्यरात्री २ ते ३ या वेळेत लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. अद्याप दाेन्ही गाड्यामधील किती प्रवाशांना लुटले व किती एेवज चाेरीला गेला हे मात्र समजू शकले नाही.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4358334c-a38d-11e8-ac5b-39217efe18eb’]
याबाबत सविस्तर वृत्त असे की,  कोल्हापूर – मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस मध्यरात्री साल्पा स्थानकातून सुटली हाेती मात्र सिग्नल मध्ये बिघाड झाल्याने थांबली. यावेळी काही लुटारूंनीकडून खिडकीतून हात घालून प्रवाशांच्या गळ्यातील दागिने लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी तोडले मात्र ते रेल्वेतच पडले. दरम्यान  लोकमान्य टिळक टर्मिनस ( LTT मुंबई) – हुबळी एक्स्प्रेसही आदरकी स्थानका जवळ सिग्नल मध्ये बिघाड करून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु या दोन्ही गाड्यातील किती प्रवाशांना लुटले व किती ऐवज चोरीस गेला हे मात्र समजू शकले नाही.
[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4e0ef759-a38d-11e8-b34b-558ab5e291d5′]

सह्याद्री एक्स्प्रेसला आरपीएफ चा बंदोबस्त होता. गाडी स्थानकातून निघाल्यानंतर गाडी सिग्नल जवळ थांबल्याचे निदर्शनास येताच आरपीएफ जवानांनी मिरज आरपीएफ ला संदेश पाठवून गाडीवर दरोड्याचा प्रयत्न झाल्याचे कळवले. परंतु हुबळी एक्स्प्रेसला बंदोबस्त नसल्याने गाडी नेमकी किती वेळ थांबली व किती ऐवज चोरीस गेला हे समजू शकले नाही. मात्र या बाबत काही प्रवाशांनी सातारा आरपीएफ कडे तक्रारी दाखल केल्या आहेत. पुढील तपास रेल्वे पाेलीस करत आहेत.