राजकीय दबावातून वन रूपी क्लिनिकचे संस्थापक डॉ. राहुल घुलेंचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वन रूपी क्लिनिकचे संस्थापक डॉ. राहुल घुले ( Dr Rahul Ghule) यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दरम्यान राजकीय दबावाखाली हा आत्महत्येचा (suicide) प्रयत्न केला असल्याचं ट्वीट राहुल घुले यांनी केलं आहे. सध्या राहुल घुले ( Dr Rahul Ghule) यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांनी प्रकृतीचे अपडेट्स देण्यासाठी काही फोटो शेअर करत ट्वीट देखील केलं आहे.

attempt to suicide | founder of one rupee clinic dr rahul ghule has attempted suicide

मागील काही दिवसापूर्वी राज्यातील काही राजकीय एजंटमुळे जीवाला धोका निर्माण झाल्याचं डॉ. राहुल घुले ( Dr Rahul Ghule) यांनी सांगितलं होतं. त्यावेळी त्यांनी याबाबत माहिती ट्विटच्या माध्यमातून दिली होती. तसंच घुले हे दिल्लीमध्ये कायमस्वरुपी शिफ्ट होणार असल्याचं देखील सांगितलं होतं. माझ्या जिवाला धोका असून मी उद्या (14 जून) माझे ट्विटर अकाऊंट ( Dr Rahul Ghule) डिलीट करणार आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल अभार,” याबाबत ट्विट त्यांनी तेव्हा केलं होतं. दरम्यान राजकीय एजंटमुळे जीवाला धोका निर्माण झाल्याची माहिती डॉ. राहुल घुले यांनी नरेंद्र मोदी यांना दिली होती. तसेच, मोदी यांच्याकडे त्यांनी मदत देखील मागितली होती.

दरम्यान, त्यानंतर आता त्यांनी आत्महत्या (suicide) करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या ते रुग्णालयात असून त्यांच्या प्रकृती स्थिर आहे. डॉ. राहुल घुले ( Dr Rahul Ghule)हे राजकीय दबावामुळे तणावात येऊन मी 30 टॅब्लेट्स खाल्ल्या. सध्या मी रुग्णालयात दाखल असल्याचं ट्वीट स्वतः त्यांनी केलं आहे. तर काही वेळानंतर त्यांनी ट्विटवर आणखी एक फोटो शेअर करत स्वतःच्या प्रकृतीचे अपडेट्स देखील दिलेत.

राहुल घुले कोण आहेत ?

राहुल घुले ( Dr Rahul Ghule) हे वन रुपी क्लिनिकचे संस्थापक आहेत. ते रुग्णांकडून फक्त एक रुपया फी घेऊन उपचार करतात. घुले यांनी मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकावर या क्लिनिकची सुरुवात केली होती. सध्याच्या कोरोना काळातही ते अव्याहतपणे काम करत असून त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकूण आठ कोविड सेंटर चालवले. या कोरोना सेंटरमध्ये एकूण 2500 पेक्षा अधिक बेड्स उपलब्ध आहेत.

हे देखील वाचा

Sanjay Raut | ‘त्या’ महिलेच्या तक्रारीची हायकोर्टाकडून दखल; संजय राऊतांच्या अडचणीत वाढ

Pune News | शेतकर्‍यांसह सर्वांची चिंता वाढविणारा हवामान विभागाचा अंदाज

‘या’ 5 मसाल्यांना मिसळून बनवा इम्युनिटी बुस्टर काढा, जाणून घ्या कधी अन् कसा प्यायचा

कोरोना व्हॅक्सीनमुळे 4000 महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या ! ‘या’ रिपोर्टने वाढवली चिंता

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा 


Web Titel : attempt to suicide | founder of one rupee clinic dr rahul ghule has attempted suicide

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update