पोलीसांची तपासात उदासीनता ; फिर्यादीचा आत्मदहनाचा प्रयत्न

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – चोरीला गेलेल्या गाडीचा तपास करण्याचा आदेश न्यायालयाने दिला असताना देखील वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी तपास केला नाही. वाहन चोरीच्या प्रकरणात पोलिसांकडून होत असलेल्या हलगर्जीपणाला कंटाळून फिर्यादीने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. लहू रामा खंडागळे असे फिर्य़ादीचे नाव असून त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्य़ालयात खळबळ उडाली. पोलिसांनी खंडागळे यांना ताब्यात घेतले आहे.

काय आहे प्रकरण ?

लहू खंडागळे यांच्या मालकीची गाडी चोरीला गेली आहे. गाडी चोरीला गेल्याची तक्रार खंडागळे यांनी आनंद नगर पोलीस ठाण्यात दिली आहे. तक्रार देऊनही पोलिसांकडून कोणतीच कारवाई होताना दिसून न आल्याने त्यांनी वरिष्ठांकडे याची तक्रार केली. वरिष्ठांनीही या प्रकरणात लक्ष न घातल्याने अखेर खंडागळे यांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने पोलीसांची कानउघडणी करून वाहन शोधण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने आदेश देऊनही पोलीसांकडून हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप करत खंडागळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्य़ालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला.

पोलीसांकडून न्यायाची अपेक्षा असताना त्यांच्याकडून शारिरीक आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप खंडागळे यांनी केला आहे. खंडागळे यांनी अंगावर डिझेल ओतून आत्महदन करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी वेळीच त्यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान पोलिसांनी खंडागळे यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी वाहन चोरीचा तपास करून आपले वाहन परत न केल्यास आपल्यापुढे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे खंडागळे यांनी सांगितले.

सिनेजगत

ऋतिकचा ‘हा’ जुना फोटो व्हायरल ; सोबत असलेली ‘ती’ लहान मुलगी आजची टॉपची अभिनेत्री

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’

#Video : ‘हे’ बॉलिवूडचे सुपरस्टार मिडिया समोर लपवितात ‘चेहरा’

शाहरूख खानची मुलगी सुहाना आता ‘या’ फिल्म मध्ये काम करणार

 

 

Loading...
You might also like