कारचालकाचा अपहरणाचा प्रयत्न करताना पोलिसावर तलवारीने वार, 4 जणांना अटक

अंबरनाथ : पोलीसनामा ऑनलाईन –  उल्हासनगरमध्ये ( Ulhasnagar) चार जणांकडून एका कार चालकाला चाकूचा धाक दाखवून अपहरण ( Kidnapped) करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वेळी एक पोलिसाला या गाडीचा संशय आल्याने त्या पोलिसाने अंबरनाथच्या ( Ambarnath) मटका चौकात ( Matka Chowk) ही गाडी रोखण्याचा प्रयत्न केला पण त्या आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला ( Attack) केला. त्या पोलिसाचे नाव बाळू चव्हाण ( Balu Chavan) असून ते या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहेत.

या ४ आरोपींकडून बाळू चव्हाण यांच्या डोक्यात तलवारीने वार करण्यात आले. आरोपी दिलखुश महेंद्र प्रताप सिंग, अंकुश महेंद्र प्रताप सिंग, युवराज नवनाथ पवार आणि आबिद अहमद शेख यांनी मध्यवर्ती पोलीस स्थानकाच्या हद्दीत त्यांच्याकडील रिक्षा सोडून त्यांनी एका गाडीचा बळजबरीने ताबा घेतला. त्या गाडीचालकाला शस्त्रांचा धाक दाखवून पुढे जात असताना ध्यवर्ती पोलीस स्थानकाचे पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळू चव्हाण यांना त्यांचा संशय आल्याने त्यांनी मटका चौकामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या आरोपींना रोखले. त्यानंतर त्या आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला त्यानंतर त्या आरोपींना मध्यवर्ती आणि विठ्ठलवाडी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले.

या अगोदर या आरोपींकडून हिललाईन पोलीस स्थानकाच्या हद्दीत एक ऑफिस व विठ्ठलवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत गंगाधर भोसले यांच्या घरासमोरील गाडीसुद्धा फोडण्यात आली आहे. या सर्वांवर याआधीसुद्धा गुन्हे ( Crime) दाखल करण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like