खळबळजनक ! दलित मुलीवर बलात्कार करून खुनाचा प्रयत्न, साखर कारखाना संचालकासह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – दलित मुलीवर बलात्कार करून तिच्या खुनाचा प्रयत्न केला. तसेच तिला राहत्या घरातून बाहेर काढून गावातून हाकलून दिले. याप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातील प्रतिष्ठित राजकीय नेते मंडळींसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये लखन कुमार काकडे, श्रीगोंदा कारखाना व बाजार समितीचे संचालक लक्ष्मण नलगे, सुधीर नलगे, भाऊ नलगे, कुमार काकडे, सांगवी दुमालाच्या सरपंच शुभांगी नलगे, स्नेहल काकडे-भोसले (सर्व रा. सांगवी दुमाला, ता. श्रीगोंदा) यांचा समावेश आहे. याबाबत काल रात्री उशिरा श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पीडित युवतीने फिर्याद दिली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, सन 2014 पासून लखन काकडे हा दलित मुलीची छेडछाड करून तिचा विनयभंग करीत होता. तसेच वारंवार शरीरसुखाची मागणी करीत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याने सदर मुलीविरुद्ध बळजबरीने शारीरिक अत्याचार केला. याबाबत तक्रार देण्यासाठी युवती श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आवारात गेली असता तिला पोलीस ठाण्यातून हाताला ओढून नेले होते. तसेच बळजबरीने इतरांच्या मध्ये तिने तिच्या तोंडात विष ओतूव खुनाचा प्रयत्न केला. दौंड येथील रुग्णालयात उपचार घेऊन ती बरी झाली.

वेळोवेळी दलित मुलीवर शारीरिक अत्याचार करून इतरांनी त्याच्या खुनाचा प्रयत्न करून शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. सांगवी दुमाला येथील राहत्या घरातून हाकलून दिले. त्यामुळे तिला दुसऱ्या गावात जाऊन रहावे लागत आहे. पीडित युवतीच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बलात्कार, खुनाचा प्रयत्न, ‘ॲट्रॉसिटी’ अॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक सातव हे करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –