हॉटेल घ्यायचे सांगत केली चाळीस हजारांची शॉपिंग, HM शहांच्या ‘नातेवाईका’चा आमदाराला ठकविण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नावे फसवणूक करणारा विराज शहाला आग्र्यामध्ये पकडण्यात आले. विराज शहा याने बाजारातील एका रेडिमेड कापडाच्या दुकानात चाळीस हजार रुपयांची खरेदी केली. यानंतर त्याच्यासोबत आलेल्या आमदार पुत्राला त्याचे बिल भरावे लागले. विराज शहा याने आग्र्याचे दक्षिण विधानसभा मतदार संघाचे योगेंद्र उपाध्याय यांना फसवणुकीचा प्रयत्न होता . मात्र वेळीच त्यांना संशय आल्याने त्यांनी पोलीस पथकाला पाचारण केले.

दरम्यान, गेल्या पाच-सहा दिवसांपासून विराज शहा उपाध्याय यांना फोन करत होता. तसंच , आपण आम्ही शहा यांचा पाहून असल्याचे सांगत होता. त्याच्या कुटुंबाला आग्र्यामध्ये हॉटेल खरेदी करायचे आहे, त्यासाठी तो आमदार यांच्या घरी आला. तिथं त्यानं चर्चा केली. त्यानंतर काही शॉपिंग करायचं असल्याचं सांगितलं. त्यानंतर तो शॉपिंग करण्यासाठी आमदारांच्या मुलासोबत गेला.

विराज शहा यांनी बाजारातील एका रेडिमेड कपड्यांच्या दुकानातून ४० हजार रुपयांची खरेदी केली. त्यानंतर त्याच्या सोबत आलेल्या आमदाराच्या मुलाला त्याचं बिलभरण्यास सांगितलं. आमदाराच्या मुलाने जेव्हा ही घटना आमदार उपाध्याय यांना फोनवर सांगितले तेव्हा त्यांच्या मनातशंका निर्माण झाली. यानंतर त्यांनी विराजला पोलीस पथकाला पाचारण केले. उपाध्ये यांनी त्याचा फोन नंबर गुगल पे वर टाकला आणि माहिती काढायला सुरुवात केली तेव्हा त्यांना या व्यक्तीने अनेकांना फसवल्याचे समजलं. या संदर्भात योगेंद्र उपाध्याय यांनी विराज शहा याच्याविरुद्ध नाई की मंडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

खरेदीचे कपडे घरी पाठविण्यास सांगितलं
त्याने खरेदी केलेले कपडे घरी पाठव आणि विलास यालादेखील घरी घेऊन ये. गुगलवर माहिती मिळविण्यासाठी उपाध्याय यांनी मुलाला सांगितलं. विराज झाला याला घरी काय बोलवलं आहे याची कल्पना आली नाही. विराज घरी येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. आमदारांनी तो घरी पोचेपर्यंत पोलिसांना कल्पना दिली होती.

You might also like