जिल्हा परिषदेत शिक्षकाचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – संस्थेतून काढून टाकल्यानंतर याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी करूनही त्याची दखल न घेतल्याने औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिक्षकाने विष  प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

पटेल मुकीम महमूद असे शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

पटेल हे एका शिक्षण संस्थेत नोकरीला होते. त्यांनी संस्थेने सेवेतून काढून टाकले. त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे केली होती. परंतु जिल्हा परिषदेत त्यांनी निवेदन देऊनही शिक्षण विभागाकडून याकडे दूर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे मुकीम सकाळी जिल्हा परिषदेत आले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन त्यांनी गाठले. त्यावेळी त्यांनी दालनासमोरच विष घेऊन आत्मत्येचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळीच त्यांना रोखले आणि त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

You might also like