वाळुने भरलेल्या ट्राॅलीची महिला तहसिलदारांच्या गाडीला जबर धडक

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – उजनी जलाशयातून अवैधरित्या वाळूने भरलेला ट्रक्टर ट्राॅलीसह तहसीलदारांच्या पथकाने रात्रीच्या वेळी इंदापूर शहरात अडविल्यानंतर तहसिलदार सोनाली मेटकरी व त्यांच्या पथकाला अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याची धमकी देवुन ट्रॅक्टर ट्राॅलीसह  घेवुन पळून जात असताना सदर ट्रॅक्टर तहसिलदार यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चालू ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्राॅलीची पिन काढून घेवून ट्राॅली रस्त्यात सोडून नुसता ट्रॅक्टर घेवून पळून जाणार्‍या चार आरोपीविरोधात इंदापूरचे मंडल अधिकारी सुनिल बबन जाधव (रा. बाब्रस मळा) यांनी इंदापूर पोलीसात फिर्याद दाखल केली असून यातील आरोपी पैगंबर कादर सय्यद याला पोलीसांनी अटक करून कोर्टात हजर केले असता त्याला सात दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.

सविस्तर असे की शनिवार (दि. २४) रोजी पहाटे ४ वाजता अवैधरित्या वाळूची तस्करी करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी तहसिलदार सोनाली मेटकरी, तलाठी औदुंबर शिंदे, अरुण येडे, विनायक कुलकर्णी व अण्णाराव मुळे असे सर्वजण सरकारी वाहन सुमो जिप नं एम.एच. ४२, ए.एक्स. १६६१ यामध्ये बसून इंदापूर शहरातील बाबा चौकामध्ये अवैद्य वाळु तस्कारी करणार्‍या वाहनावर कारवाई करत असताना पहाटे ५ वा. चे सुमारास कालठन नं.२ ते इंदापूर या रोडने एक टॅक्टर व त्यास एक ट्रॉली जोडलेली वाहन येताना दिसले. सदर ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रालीमध्ये वाळु असल्याचे दिसुन आले. त्यावेळी ट्रॅक्टर चालक ड्रायव्हर (पूर्ण नाव माहीत नाही) व आरोपी पृथ्वीराज जगताप, पप्पु जगताप, पैगंबर सय्यद यांना सदरचा ट्रॅक्टर थांबविणेस सांगितले असता, त्यांनी ट्रॅक्टर न थांबवता तसाच बाबा चौकातून पुढे जुना कचेरी रोडने घेवून जात असताना तहसिलदार पथकाने  त्याचा पाठलाग केला. त्यावेळी वरील लोकानी तुम्ही महसुलचे अधिकारी व कर्मचारी व तहसिलदार मॅडम हे आम्हाला नेहमीच त्रास देतात तुम्ही आमचा ट्रॅक्टर थांबवू नका, नाहीतर तुमच्या सरकारी जिपवर ट्रॅक्टर घालुन तुम्हा सर्वांना जिवे मारु अशी धमकी दिली.

त्यापैकी एकाने ट्रॅक्टरच्या पाठीमागे जोडलेले ट्रॉलीची पिन काढुन ट्रॅक्टर तसाच पुढे घेवुन गेले, त्यावेळी चालु ट्रॉलीची पिन काढल्यामुळे सदरची वाळु भरलेली ट्रॉली ही तहसालदार सोनाली मेटकरी व पथकाच्या सरकारी जिप वर येवून धडकली, त्यामध्ये जिप मधून अधिकाऱ्यांनी उड्या मारुन खाली उतरले व ट्रॅक्टरवरील तीन इसमांचा व ड्रायव्हरचा पाठलाग केला असता ते ट्रॅक्टर तसेच पुढे घेवुन पळुन गेले त्यामध्ये सरकारी सुमो जिपचे नुकसान झाले. नंतर तहसिलदार यांनी इंदापूर पोलीस स्टेशनला फोनद्वारे कळवून पोलीस मदत मागुन घेतली. पोलीस तेथे आलेवर सदरची वाळु भरलेली ट्रॉली तिचे मध्ये एक ब्रास वाळु असलेने ही पोलीसांचे मदतीने इंदापूर नगरपालिकेचा ट्रॅक्टर जोडुन सदरची ट्रॉली ही पोलीस स्टेशनला जमा केली असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे करीत आहेत.
आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like