Cyber Attack : SBI कडून 44 कोटी ग्राहकांना इशारा, ‘या’ चुकीमुळं होऊ शकतं तुमचं अकाऊंट रिकाम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांना संभावित सायबर हल्ल्याबाबत इशारा दिला आहे. बँकेने रविवारी संध्याकाळी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपल्या ग्राहकांना अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे. या पोस्टमध्ये काही मोठ्या शहरांमध्ये होणाऱ्या संभावित सायबर हल्ल्याबाबत भाष्य करण्यात आले आहे.

यामध्ये एसबीआयने ग्राहकांना असं आवाहन केले आहे की, हे हल्लेखोर कोव्हिड-19 च्या नावाखाली बनावट इमेल पाठवून लोकांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरी करत आहेत. यापूर्वी दिल्ली सायबर सेलने देखील लोकांना व्हॉट्सअ‍ॅपवरून बँकेसंबधीत माहिती शेअर न करण्याचे आवाहन केले होते. या हॅकर्सकडून बँकेची संपूर्ण माहिती हॅक केली जात आहे.
SBI ने या संदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये असे लिहले आहे की, आमच्या असे नजरेत आले आहे की भारतातील काही प्रमुख शहरांमध्ये सायबर हल्ला होऊ शकतो. ncov 2019 @ gov. in वरून येणारे मेल, ज्याची सबजेक्ट लाईन Free COVID-19 Testing अशी आहे. अशा मेल पासून सावध रहा.

एसबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जवळपास 20 लाख भारतीयांचे ईमेल हॅकर्सनी चोरी कले आहेत. फ्री कोरोना टेस्ट करण्याबाबत मेल करून ते अनेकांना गंडा घालत आहेत. ncov 2019 @ gov. in यावरून हे फेक मेल केले जात आहे. SBI ने देशातील मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई आणि अहमदाबाद या शहरांना बनावट मेल संदर्भात अधिक सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

भारत कम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने यापूर्वीच यासंदर्भात इशारा देत प्रत्येक सरकारी विभागांना याबाबत सूचित करण्यात आले होते. यावेळी सामान्य नागरिकांना त्यांची शिकार बनवत आहेत. 2016 मध्ये बँकिंग संबंधातील संस्थांना मोठ्या सायबर हल्ल्याचा सामना करावा लागला होता. ज्यावेळी अनेक एटीएम प्रभावित झाले होते. डेबिट कार्डच्या पिनबरोबरच वैयक्तिक माहिती चोरीला गेली होती.