कागदपत्र नसताना देखील तुम्ही बनवु शकता ‘Aadhaar’ कार्ड, ‘UIDAI’ चे नवे नियम लागू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्ड सध्या खूप महत्वाचे आहे. सरकारी काम असो वा खाजगी अनेक महत्वाच्या कामांमध्ये आधारकार्ड लागतेच. मात्र काही लोकांना कागदपत्रेच उपलब्ध नसल्यामुळे आधार काढता येत नाही अशा लोकांसाठी महत्वाची बातमी आहे. युआयडीआयने ने एक स्टँडर्ड सर्टिफिकेट लागू केले आहे. अर्जदार हे सर्टिफिकेट आमदार, खासदार अशा लोकप्रतिनिधींकडून मिळवू शकतात. या प्रमाणपत्रासाठी अर्जदाराला आपली योग्य माहिती देणे गरजेचे आहे.

या ठिकाणी मिळू शकते प्रमाणपत्र
एका परिपत्रकानुसार विविध अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घेण्यासाठी प्रमाणित स्वरूप नव्हते. ज्या लोकांकडे पुरेशी कागदपत्रे नाहीत, त्यांना यामुळे समस्या येत होती. हे पाहता प्रमाणपत्रांचे प्रमाणित स्वरूप तयार केले गेले आहे. ते खासदार, आमदार किंवा राजपत्रित अधिकारी किंवा तहसीलदार किंवा शैक्षणिक संस्था प्रमुख किंवा नगरसेवक यांच्याकडून घेता येतील.

या मुळे घेण्यात आला हा निर्णय
लोकांना भेडसावत असलेल्या समस्या लक्षात घेऊन हे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. याचे नाव ‘सर्टिफिकेट फॉर आधार एनरोलमेंट/अपडेट’ असे ठेवण्यात आले आहे आणि याची वैधता केवळ तीन महिन्यांची आहे. तीन प्रकारे एखादा व्यक्ती हे प्रमाणपत्र प्राप्तीसाठी कागदपत्रांच्या सहाय्याने कुटुंब प्रमुखाच्या मदतीने अर्ज करू शकतो.

कागदपत्रे नसल्यामुळे व्यक्तीची ओळख, पत्ता आणि जन्म तारीख एकाच सर्टिफिकेट मध्ये द्यावे लागते. हे प्रमाणपत्र पदाधिकारी देऊ शकतात.

या कागदपत्रांची पूर्तता केल्यावर मिळू शकते आधार
जर आपल्याकडे पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र इत्यादीचा पुरावा (पीओआय) असेल, तर पासपोर्ट, बँक स्टेटमेंट / पासबुक, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स आणि जन्म पुरावा यासारख्या पत्त्याचा पुरावा (पीओआय) असेल तर आपण आधार कार्डसाठी अर्ज करू शकता.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/