श्री महागणपती मंदिराला फुलांची आकर्षक व मनमोहक सजावट !

शिक्रापुर : प्रतिनिधी( सचिन धुमाळ) –   श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट हे अष्टविनायकातील महत्वाचे स्थान आहे. अष्टविनायका मधील हे आठवे स्थान असुन या महागणपतीचा लौकिक सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा गणपती म्हणुन आहे. प्रतिवर्षाप्रमाणे श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे या वर्षी दि.२०.०८.२०२० ते २५.०८.२०२० या कालावधीत होणारा भाद्रपद गणेशोत्सव व “श्रीं” ची मुक्तव्दार यात्रा रदद करण्यात आलेली आहे. यामुळे या कालावधीत दर्शन, मुक्तव्दार दर्शन म्हणजे प्रत्यक्ष मुर्तीला हात लावुन दर्शन व देवाला जलाभिषेक बंद आहे. पालखी सोहळा रदद करण्यात आलेला आहे. व्दारयात्रा, भाविकांची दंडवते, कीर्तन, भजन असे कार्यक्रम रदद करण्यात आलेले आहेत.

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट च्या वतीने आज “श्री गणेश चतुर्थी“ च्या दिवशी पहाटे. ४.३० वाजता अभिषेक व नित्य नियमीत पुजा करण्यात आली. देवस्थान च्या वतीने सकाळी. ८ वाजता नैवद्य करण्यात आला. त्यानंतर सकाळी ९ ते १२ या वेळेत देवस्थान च्या वतीने श्रीं चीं सहस्त्र आवर्तने, महापुजा व महानैवेद्य करण्यात आला. तसेच दु.१२वाजता उत्सवमुर्ती पुजा करून मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली.त्यानंतर उत्तरव्दार ढोक सांगवी येथील “मुक्तार्इ देवी मंदिर” या ठिकाणी आरती व जोगवा करण्यात आला. सायं.६ ते रात्री १०.३० या वेळेत देवस्थान च्या वतीने श्रीं चीं सहस्त्र आवर्तने, महापुजा व महानैवेद्य करण्यात आला.

दर चतुर्थीप्रमाणे याही चतुर्थीला प्रगतशिल शेतकरी श्री.नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर यांच्या वतीने श्री महागणपती मंदिराला फुलांची आकर्षक व मनमोहक सजावट करण्यात आली होती. तसेच उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख , तहसीलदार लैला शेख यांनी मंदिर परिसरात प्रत्यक्ष पाहणी करून भाविक, भक्तगण, ग्रामस्थ यांनी देवस्थान ट्रस्ट ला या कोरोना महामारी च्या काळात सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली. रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक मा.सुरेशकुमार राऊत व सहाय्यक पोलीस निरिक्षक मा.प्रफुल्ल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट चे वतीने भाविक , भक्तगण , ग्रामस्थ व अशा अनेक गणेश भक्तांच्या साठी आँनलार्इन दर्शन सुविधा शेमारो भक्ती या अँपवर महागणपती लार्इव दर्शन सेवा यानुसार चालू केलेली आहे.हे अँप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करता येते. श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त मंडळाच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात येते की, सर्वांनी भाद्रपद गणेशोत्सव कालावधी मध्ये या आँनलार्इन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा व आपले घरी राहूनच श्री महागणपतीची आराधना करावी.आपल्या सह संपूर्ण जगावर आलेल्या कोरोना महामारीचे संकटापासून आपण व आपले कुटुंबीय सुरक्षित रहाण्यासाठी घरी रहा व सुरक्ष्ति रहा.