कोरेगाव-भीमाच्या विजयीस्तंभावर आज उसळणार अनुयायांची गर्दी 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरेगाव भीमा येथील विजयी स्तभांला अभिवादन करण्यासाठी आज लाखोंच्या संख्येने अनुयायांची गर्दी उसळणार आहे. विशेष म्हणजे काल संध्याकाळपासूनच येथे मोठ्या प्रमाणावर अनुयायांनी गर्दी केली आहे. येथे कायदा व सुव्यवस्था राखगण्यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झाले असून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच येथील विजयी स्तंभ आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला असून रोषणाई करण्यात आली आहे. मागील वर्षी काही समजाकंटकांनी येथे अभिवादन करून परतणाèयांवर हल्ला केल्याने दंगल उसळली होती. यामुळे यावर्षी पोलिस दल सतर्क झाले आहे.

शासनाच्या वतीने वाहतूक आणि गर्दीचे नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाच्या ७ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणेच जिल्ह्यामध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या रस्त्यांवर नाकेबंदी करण्यात आली आहे. प्रशासनाने ३५ ठिकाणी नागरिक सूचना केंद्र स्थापन केले आहेत.

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यात होणाऱ्या सभेला उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली होती. त्यानंतर काहीसा तणाव निर्माण झाला होता. यावेळी चंद्रशेखर आझाद यांनी कोरेगाव-भीमा दंगलीतील आरोपी भिडे, एकबोटे यांच्यावर कारवाई का केली जात नाही असा सवालही केला आहे. तसेच महाराष्ट्रात हुकमशाही सुरू असून ब्राम्हणवाद्यांकडून दलित आणि मराठा समाजात भांडण लावण्याचे काम सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

Happy New Year २०१९ : सर्वत्र नववर्षाचे जल्लोषात स्वागत !