Atul Bhatkhalkar । ‘खरे सूत्रधार ‘सिल्व्हर ओक’ आणि ‘वर्षा’वर बसलेत’; भाजपचा जोरदार आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Atul Bhatkhalkar । सक्तवसुली संचालनायलयाने (ED) आज (शुक्रवार) सकाळी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या नागपुरमधील निवासस्थानी छापा टाकला. तसेच, ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानासह त्यांच्या निकटवर्तीयांकडे देखील छापे टाकल्याचे समोर आले आहे.

atul bhalkhalkar tweeted about ncp sharad pawar and cm uddhav thackeray on ed raid

महिन्याभरात दुसऱ्यांदा ईडीकडून कारवाई झाल्याने आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत
आणखी वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. तर दुसरीकडे भाजप नेते सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका
करत आहे. तर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

 

 

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘अनिल परब आणि अनिल देशमुख हे दोघेही केवळ प्यादी असल्याच भातखळकर यांनी म्हटलं आहे. आज ईडीची कारवाई ज्यांच्यावर झाली ते अनिल देशमुख आणि त्याच प्रकारचे आरोप असलेले अनिल परब ही प्यादी आहेत. खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसले आहेत.

Election Commission चं ठाकरे सरकारला पत्र, म्हणाले – ‘OBC राखीव जागांसाठीची पोटनिवडणूक होणारच’

असा आरोप करत अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान असलेले ‘सिल्व्हर ओक’ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निवासस्थान ‘वर्षा’ या बंगल्यांच्या नावावरून भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी अप्रत्यक्ष टोला आहे.

काय आहे प्रकरण?
11 मे रोजी ईडीने मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. दुसरीकडे CBI नेही देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला असून तपास सुरु आहे. CBI कडून अनिल देशमुख यांची चौकशीदेखील करण्यात आली आहे.

Mumbai Local Train | मुंबईची लोकल सुरु होण्याचे संकेत?, Local पावसाळी अधिवेशनानंतर धावण्याची शक्यता

CBI ने दाखल केलेल्या FIR चा अभ्यास केल्यानंतर ED ने गुन्हा दाखल करत कारवाईला सुरुवात
केली होती. दरम्यान, आज देशमुख यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली असून नागपूरसह वरळीच्या
घरावरही छापा टाकण्यात आला आहे. ED कडून एकीकडे अनिल देशमुखांच्या नागपूरमधील
निवासस्थानी छापा टाकण्यात आलेला असताना दुसऱ्य़ा टीमने वरळीच्या सुखदा इमारतीमधील
घरावरही छापा टाकण्यात आला आहे.

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : atul bhalkhalkar tweeted about ncp sharad pawar and cm uddhav thackeray on ed raid

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update