Atul Bhatkhalkar | अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, फारुख अब्दुल्ला दिवाळी दसरा मातोश्रीतच…  

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फारुक अब्दुल्ला (Farooq Abdullah) आता मला भेटले तेव्हा त्यांनी अजिबात घाबरू नकोस. लढ वडीलांसारखा लढ, असे म्हटल्याचे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray) यांनी काल छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले होते. यानंतर भाजपाने (BJP) उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी देखील टीका केली आहे. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) ट्वीट करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

 

अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, बाळासाहेब आणि फारुक अब्दुल्ला यांची मैत्री होती… उद्धव ठाकरे, अब्दुल्ला दिवाळी दसरा मातोश्रीतच साजरा करायचे असेही सांगून टाकायचे.

 

काल छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे म्हणाले होते की, फारुक अब्दुल्ला आणि माझी बर्‍याच दिवसांनी भेट झाली. अब्दुल्ला यांचे वय झाले आहे. महाराष्ट्र आणि जम्मू-कश्मीर (Jammu and Kashmir) फार दूर आहे. फारुक अब्दुल्ला आता मला भेटले तेव्हा त्यांनी अजिबात घाबरु नकोस. लढ वडीलांसारखा लढ, असे सांगितले, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.

 

याच कार्यक्रमात ठाकरे यांनी आणखी एक मोठे वक्तव्य केले ते म्हणजे,
जर छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली नसती तर ते नक्कीच मुख्यमंत्री (CM) झाले असते.
प्रत्येकाचेच वय वाढत असते. पण बाळासाहेब सांगायचे वयाने माणूस मोठा होत असतो.
पण ज्या क्षणी तो विचारांनी थकतो तो वृद्ध होतो.
त्यामुळे छगन भुजबळ असो, फारुक अब्दुल्ला असोत किंवा मग शरद पवार अजूनही तरुण मनाची माणसे आहे.
नुसते तरुण मनाचे असून चालत नाही. तुमच्या मनात जिद्द असावी लागते एक इर्ष्या असावी लागते. ती या माणसांमध्ये आहे.

 

Web Title :- Atul Bhatkhalkar | bjp leader atul bhatkhalkar criticized uddhav thackeray over farooq abdullah

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sandipan Bhumre | नाराज संजय शिरसाटांना मंत्रिपद मिळणार की लटकवणार, मंत्री भुमरे स्पष्टच बोलले…

Andheri by-Election | ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला तर? ठाकरेंचा प्लॅन बी

Subhash Desai | घोडा मैदान आता लांब नाही, शेलारांच्या टीकेला सुभाष देसाईंचे प्रत्युत्तर