Atul Bhatkhalkar | संजय राऊतांच्या कटुता संपवण्याच्या वक्तव्यावर अतुल भातखळकर यांचा टोला म्हणाले -‘फक्त याची सुरुवात त्यांनी…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) हे जामिनावर बाहेर आल्यानंतर ते अधिक आक्रमक पवित्रा घेतील असे वाटले होते. मात्र, आज माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे कौतुक केले आणि कटुता संपवण्याची भाषा केली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार (BJP MLA) अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी संजय राऊतांना जोरदार टोले लगावले आहेत. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 

अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar ) म्हणाले, चांगली गोष्ट आहे. संजय राऊत कटुता संपवण्याची भूमिका मांडणार असतील, तर चांगली गोष्ट आहे. फक्त त्याची सुरुवात त्यांनी स्वत:पासून, स्वत:च्या पक्षापासून करायला हवी. खोके, गद्दार, खंजीर, लोकांना घरात जाऊन मारहाण केल्यानंतर शिवसैनिकांचं (Shiv Sainik) समर्थन करणं, माजी नौदल अधिकाऱ्यांना केलेली मारहाण हेही थांबवावं.

 

ते पुढे म्हणाले, मागील अडीच वर्षात महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील कटुता वाढली. याला शिवसेना, त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) आणि जतेंद्र आव्हडांसारखी (Jitendra Awhad) मंडळी जबाबदार आहेत, असा आरोप भातखळकर यांनी केला.

 

कटुता संपवावी ही भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. कारण आमची ही कायमची भूमिका आहे.
अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) कायम म्हणत आलेत
आणि आम्हीही म्हणत आलो की, राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, तर विरोधक असतो.
हल्ले करायचे, घाणेरड्या भाषेत बोलायचं असं सुरु असल्याचे भातखळकर म्हणाले.

 

Web Title :- Atul Bhatkhalkar | bjp mla atul bhatkhalkar comment on shivsena mp
sanjay raut over meeting with devendra fadnavis

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा