Atul Bhatkhalkar | ‘वसुलीचा रिमोट कंट्रोलही शरद पवार आहेत का?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ‘एक तीर दो निशाना’ साधत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना टोला लगावला आहे. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी नाना पटोले यांच्या वक्तव्याचा आधार घेत निशाणा साधला आहे. शरद पवार हे महाविकास आघाडी (MVA) सरकारचे रिमोट कंट्रोल आहेत, असे म्हटले होते. याच वरुन भातखळकर यांनी खोचक टोला लगावला आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटले की, नाना पटोले म्हणतात महाविकास आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल शरद पवार आहेत. त्यांचे म्हणणे शंभर टक्के सत्य आहे. केवळ सरकारचेच नाही तर राज्यात सुरु असलेल्या वसुलीचा रिमोटही ते आहेत ?, असे नानांना सुचावयचे आहे का ? असा खोचक टोला भातखळकर यांनी लगावला आहे. भातखळकर पुढे म्हणतात, प्रॉब्लेम फक्त एवढा आहे, की टीव्ही घरातील कडी बंद असल्यामुळे रिमोट अगदीच निरुपयोगी झाला आहे.

काय म्हणाले नाना पटोले ?

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे शरद पवार रिमोट कंट्रोल आहेत आणि ते आमच्यासाठी आदरणीय आहेत. वेळ येईल तेव्हा मी स्वत: पवार त्यांना भेटेन परंतु ती वेळ अद्याप आली नाही. पक्षश्रेष्ठींनी मला पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी दिली आहे ती मी पार पाडणार. मी काही शिवसेना (Shivsena) वा राष्ट्रवादीवर हल्ला करीत नाही, तर भाजपवर (BJP) करतो, असे नाना पटोले म्हणाले होते.

हे देखील वाचा

Pune News | कात्रज- कोंढव्यात वस्तीनिहाय आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा बंद राहाणार; 19 जुलैपासून वेळापत्रकाची अंमलबजावणी

LPG Price | दिलासादायक ! आता स्वस्तात होईल स्वयंपाक, गॅसच्या वाढत्या महागाईचे नो-टेन्शन, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Atul Bhatkhalkar | sharad pawar also the remote control of recovery asked bjp leader

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update