Atul Bhatkhalkar | अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले – ‘…त्यासाठी घराची कडी काढावी लागते’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Atul Bhatkhalkar | सेवानिवृत्त विभागीय आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर (CM Adviser Dr. Deepak Mhaisekar) यांच्या ‘कोविड मुक्तीचा मार्ग’ (Covid Mukticha Marg) या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी त्यांनी अचानक मिळालेली मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आणि त्यानंतर आलेले कोरोनाचे संकट यावर त्यांनी भाष्य केलं होत. त्या विधानाचा आधार घेत भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

भातखळकर म्हणाले की, काय करावं आणि काय करू नये हे घरात बसून कसे कळेल ? त्यासाठी घराची कडी काढावी लागते, मंत्रालयात जावं लागतं, अधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागते, फायली चाळाव्या लागतात, रात्री अपरात्री फोन घ्यावे लागतात… थोडक्यात काम करावं लागतं, अशा शब्दात त्यांनी टोला लगावला आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ?

शनिवारी झालेल्या पुस्तकाचं प्रकाशन (book Publication) सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, मला कोणत्याही व्यवस्थापनाचा, राज्यकारभाराचा अनुभव नाही, पण मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी माझ्यावर अचानक आली. मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतो ना घेतो तो पर्यंत कोरोनाचे संकट आले. टीव्हीत, बातम्यांमध्ये आपण ज्या विषाणूंना पाहत होतो आता तोच विषाणूजन्य आजार (covid situation in maharashtra) आपल्या राज्यात येऊन पोहोचला. काय करावं, कोणता निर्णय घ्यावा काय सुरु करावं काय बंद करावं याबाबत मला काही कळत नव्हतं. निर्णय घेणे अवघड झाले होते. मात्र त्यावेळी केंद्राच्या सूचनांनुसार (instructions of the Center) काम सुरु झालं आणि लॉकडाउनचा (lockdown) पर्याय समोर आला असे त्यांनी म्हंटले होते.

हे देखील वाचा

Corona | तब्बल 100 दिवस ‘तिने’ केला कोरोनाशी ‘संघर्ष’; 45 वर्षांची महिला कोरोनावर मात करुन परतली घरी

Health News | सावधान ! ‘हे’ 4 पदार्थ खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी प्यायल्यास होऊ शकते आरोग्याचे मोठे नुकसान, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Atul Bhatkhalkar slam uddhav thackeray covid situation in maharashtra accidental chief minister

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update