Atul Bhatkhalkar | ‘एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी अन् आदित्य ठाकरेंची स्कॉटलँड वारी’ – अतुल भातखळकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Atul Bhatkhalkar | गेल्या काही दिवसांपासून राज्यभर एसटी कामगारांचा संप सुरू आहे. यामुळे राज्यात प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे. या पार्श्वभुमीवर भाजप (BJP) आणि सत्ताधारी महाविकास आघाडीत (MVA) आरोपांच्या फैरी झडत आहेत. यातच आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

 

अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) म्हणाले, महाराष्ट्रात एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी, अन आदित्य ठाकरेंची जनतेच्या पैशावर स्कॉटलँड वारी, अशी स्थिती आल्याचे दिसते आहे. या दौऱ्याचा खर्च आदित्य ठाकरे यांच्याकडून वसूल करावा, अशी मागणीच भातखळकर यांनी केलीय. या परिषदेस आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाच्या नावाखाली निकटच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पर्यटन करण्याचा सपाटा लावला आहे. महत्वाचे म्हणजे तेथे केवळ देशाच्या प्रमुखांनाच परवानगी असताना आदित्य ठाकरे हे कोणत्या अधिकारात ग्लास्गोला गेले होते ? त्याचे त्यांना निमंत्रण होते का? असा भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

 

पुढे ते म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST workers strike), राज्याला पडलेला प्रदूषणाचा विळखा याकडे दुर्लक्ष करून, स्कॉटलँडच्या ग्लास्गो येथील पर्यावरण बदल परिषदेच्या निमित्ताने (सिओपी-26) राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे तेथे पर्यटन करीत आहेत. रोम जळत असताना निर्विकारपणे फिडेल वाजवीत बसलेल्या निरोची आठवण यानिमित्ताने येत असल्याची टीका, भातखळकर यांनी केली.

तसेच, मागील तीन आठवड्यांपासून एसटी कामगारांचा संप सुरुय. त्यामुळे एसटी ठप्प होऊन तिच्या तोट्यात भर पडत आहेच, पण संपामुळे प्रवाशांचेही हाल होत आहेत. तरीही परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्यसचिव आशिष कुमार यांना तेथे सहकुटुंब सोबत घेऊन जाण्याचे ठाकरे यांना कारण काय? ठाकरे यांच्यासह अधिकाऱ्यांचा खर्च जनतेच्या पैशातून का करण्यात आला? एवढा लवाजमा सोबत नेत आदित्य ठाकरे यांनी त्या परिषदेतून महाराष्ट्रासाठी काय आणले? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता मुख्यमंत्र्यांनीच उत्तरे द्यावीत. असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Atul Bhatkhalkar | st workers strike pollution problem aditya thackeray bjp mla atul bhatkhalkar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Tamil Brahmin | तमिळ ब्राह्मणांना विवाहासाठी मिळत नाहीत वधू ! 40 हजारपेक्षा जास्त तरूण ‘कुमार’, जाणून घ्या कारण

Real Estate Prices | ‘या’ कारणामुळं फ्लॅट-घरांच्या किंमतीत होवू शकते तब्बल 15 टक्क्यापर्यंतची वाढ, जाणून घ्या

Wifi Range Extender | आता यूजर्सला मिळेल वादळासारखा इंटरनेट स्पीड ! 1KM अंतरावरून सुद्धा होवू शकते WiFi ‘कनेक्ट’, झटपट होतील सर्व कामे