भातखळकरांचा शिवसेनेला पुन्हा इशारा, म्हणाले – ‘सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) (Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra) राम मंदिर उभारणीसाठी (Construction of Ram temple)
केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार (Corruption in land purchase) झाल्याचा आरोप आम आदमी पक्ष (AAP) आणि समाजवादी पक्षाने (samajwadi party) केला.
यामुळे पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे. परंतु हे आरोप श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट(Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra) चे महासचिव चंपत राय (Champat Rai, Vice President of Vishva Hindu) यांनी सविस्तर निवेदन प्रसिद्ध करून फेटाळले आहेत.
या मुद्यावर महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi government) तिन्ही पक्षांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.
तर, शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena leader Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तसंच सरसंघचालक मोहन भागवत
(Sarsanghchalak Mohan Bhagwat) यांनी खुलासा करावा, अशी मागणी केली आहे.
यावर आता भाजप (BJP) नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

अतुल भातखळकर यांचा इशारा (Atul Bhatkhalkar’s warning)

अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी या अगोदर या मुद्यावरून शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टीका केलेली आहे.
“सोनिया (Sonia) मातोश्रींची (Matoshri) सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या (Hindu) श्रद्धास्थानांवर आघात करते आहे.
ही सुपारी कातरून तोंडात टाकण्याची ताकद हिंदू समाजात (Hindu society) आहे हे विसरू नका !, असा इशाराच त्यांनी दिलेला आहे.
सत्तेसाठी चरणचाटण खुशाल करा,पण… (Do whatever needed for Power, but)
राम मंदिराच्या (Ram Mandir) धर्मकार्यात अडथळा आणणारी शिवसेना (Shivsena) कुणाच्या इशाऱ्यावर नाचते आहे, हे जगाला ठाऊक आहे.
काँग्रेस (Congress), शिवसेना (Shivsena) आदी विरोधकांनी केलेले आरोप बोगस होते हे उघड (Exposed) झाले आहे.
सत्तेसाठी काँग्रेसचे (Congress) चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा.
जय श्रीराम..” असा इशारा अतुल भातखळकर यांनी ट्विटद्वारे शिवसेनेला दिला आहे.

शिवसेनेनं हजरत टिपूचा विचार करावा (Shivsena should take advice from Tipu Sultan)

याशिवाय, लोकांनी श्रद्धा आणि विश्वासाने राम मंदिरासाठी देणग्या (Donations for Ram Temple) दिल्या आहेत, त्याचा व्यवस्थित हिशोबही (Ledger) ठेवला जातो.
शिवसेनेला विश्वास नसेल तर त्यांनी दिलेले एक कोटी परत मागावे. त्यातून एखादी टिपूची (Tipu Sultan) मजार बांधावी.
शिवसेनेच्या जीवावर मंदिर निर्माण सुरू नाही, असंही त्यांनी म्हटलेलं आहे.
तसंच शिवसेनेने आता ‘हजरत टिपू’चा विचार करावा, राम मंदिराचा विचार करण्यासाठी संघ परिवार आणि हिंदू समाज सक्षम आहे, असंही भातखळकरांनी सांगितलेलं आहे.

सत्य समजलं पाहिजे

तर, जनतेच्या पैशातून मंदिर उभारलं जात असल्याने लोकांना सत्य काय ते समजलं पाहिजे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांनी म्हटलेलं आहे.
शिवसेना खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale ) यांनी देखील या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जावी, अशी मागणी केलेली आहे.

राजकीय द्वेष पसरवण्यासाठी बिनबुडाचे आरोप (Baseless allegations are done to spread political hatred)

आरोपांना उत्तर देताना, खुल्या बाजारातील किमतीपेक्षा कमी दराने ट्रस्टने जमीन खरेदी केली असून, राजकीय द्वेष (political hatred) पसरवण्यासाठी बिनबुडाचे आरोप (Baseless allegations) होत.
असल्याचा दावा ट्रस्टचे महासचिव चंपत राय (Trust General Secretary Champat Rai) यांनी केला आहे. तसेच, या संपूर्ण वादावर श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने केंद्र सरकारला (Central Government) अहवाल (Report) पाठविला आहे.
ट्रस्टने सर्व आरोपांना विरोधी पक्षांचा कट असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकार व्यतिरिक्त ट्रस्टने भारतीय जनता पार्टी (BJP), राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही (RSS) अहवाल पाठविला आहे.
ज्यामध्ये जमीन खरेदीसंदर्भातील सर्व माहिती देण्यात आली आहे आणि किंमती कशा वेगळ्या आहेत हे स्पष्ट केले आहे.

जाणून घ्या हे प्रकरण (know the full story)

रविवारी पत्रकार परिषद घेऊन लखनौमध्ये ‘आप’चे खासदार संजय सिंह (AAP MP Sanjay Singh) आणि समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे (Pawan Pandey) यांनी ट्रस्टने जमीनखरेदीत घोटाळा केल्याचा आरोप केला.
दोन कोटींची जमीन अवघ्या पाच मिनिटांत 18.5 कोटी रुपयांना ट्रस्टने खरेदी केली आहे.या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय (CBI) व सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) चौकशी करण्याची मागणी संजय सिंह यांनी केली. त्याबाबत चंपत राय यांनी निवेदन सादर केले.
गेले 100 वर्ष आमच्या वर कुठले ना कुठले आरोप झाले आहेत. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची हत्या केल्याचाही आरोप आमच्यावर केला गेला.
अशा कोणत्याही आरोपांची आम्ही पर्वा करत नाही. या नव्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे याची शहानिशा करून प्रत्युत्तर दिले जाईल,
असे चंपत राय यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title :  Shri Ram Janmbhoomi | atul bhatkhalkar warn shiv sena regarding ram mandir, said  the world knows at whose behest shiv sena is obstructing the dharma work of ram mandir

 

हे देखील वाचा

Pune Crime News | लष्कर परिसरात तोडफोड केल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून एकाला अटक

Swargate Police Station |अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; गळा दाबून जीवे मारण्याची दिली धमकी