पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात लोक चर्चेतून अतुल गायकवाड यांचे नाव आघाडीवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान नगरसेवक अतुल गायकवाड यांचे नाव लोकांच्या चर्चेत आहे. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये गायकवाड यांनी अनेक विकास कामे केली असून भाजपाचे जुने, प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची मतदारसंघात ओळख आहे. मागील तीन दशकांपासून अतुल गायकवाड हे भाजपाचे काम करत असून त्यांचा या मतदारसंघामध्ये जनसंपर्क दांडगा आहे.
अतूल गायकवाड

अतुल गायकवाड यांनी त्यांच्या उपाध्यक्षपदाच्या कार्यकाळात कॅन्टोन्मेंट बोर्ड आवारात गोळीबार मैदान चौकात छत्रपती शिवजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आपल्या सर्व सहकारी नगरसेवकांच्या मदतीने बसवून हजारो वर्षांच्या इतिहास रचून कॅन्टोन्मेंट वासीयांचे अनेक वर्षापासूनचे स्वप्न पूर्ण केले, अशी लोकांमध्ये चर्चा आहे. तसेच स्मशानभूमी आधुनिकीकरण व नूतनीकरण अशा प्रकारची अनेक कामे कॅन्टोन्मेंट विभागात कुठलाही सक्षम निधी उपलब्ध नसताना केवळ, आपल्या अभ्यासू, कौशल्य आणि जनसंपर्काच्या जोरावार केली आहेत. ज्याचा फायदा आज केवळ कॅन्टोन्मेंट वासीयच नाही तर संबंध विधानसभेच्या नागरिकांना होताना दिसत आहे.

अतुल गायकवाड यांचे नाव चर्चेत आल्यापासून कॅन्टोन्मेंट वासीयांच्यामधे उत्साहाचे वातावरण आहे. तसेच त्यांची पहिल्यांदाच स्थानिक, स्वच्छ, प्रामाणिक व अभ्यासू उमेदवार म्हणून सर्व समाजात चर्चा आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन सर्व पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या विषयी आपुलकी असल्याचे जाणवते. २१ व्या शतकातही लोकवर्गणीतून निवडून आलेले नगरसेवक अशी त्यांची खास प्रतिमा लोकांमध्ये आहे, कॅन्टोन्मेंट मतदार संघातील नागरी समस्यांची जाण असलेला सामान्य कार्यकर्ता, यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अतुल गायकवाड यांना भाजपाने उमेदवारी द्यावी अशी मागणी मतदारसंघातील सर्व समाजातील नागरिकांकडून होत आहे. गायकवाड यांनी यागोदरही २०१४ च्या लोकसभा, विधानसभा व त्यागोदारच्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत विधानसभा प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडून पक्ष्याच्या विजयात महत्वाचे काम केल्याने आणि स्थानिक रहिवासी असल्याने त्यांचा सर्व पक्षीय कार्यकर्त्यांशी दांडगा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू मनाली जाते.

भाजपाचे एकनिष्ठ आणि सुशिक्षीत व सुसंस्कृत असलेल्या अतुल गायकवाड यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघाला तळागाळातील कार्यकर्त्यांची जाण असलेला आमदार मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणच्या जनतेला आहे. अतुल गायकवाड यांना उमेदवारी दिल्यास यांचा विजय निश्चित मानला जात असल्याची चर्चा मतदारसंघात आहे.

आरोग्यविषयक वृत्त