Atul Londhe | ‘नागपूरचे देवेंद्र फडणवीस मुंबईच्या झगमगाटात हरवले, विदर्भाला विसरले’ – अतुल लोंढे

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Atul Londhe | राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि भाजप (BJP) यांच्यात सतत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. अशातच काँग्रेसचे (Congress) मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. ‘देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. परंतु मुख्यमंत्रीपदाची 5 वर्षे व त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त झाल्यापासून देवेंद्र फडणवीस हे मुंबईच्या झगमगाटात हरवले असून विदर्भ व नागपूरचा (Vidarbha And Nagpur) त्यांना विसर पडला असल्याचं,’ अतुल लोंढे म्हणाले.

 

”देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील नेते आहेत.
स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा असो वा विदर्भातील इतर महत्वाच्या प्रश्नावर ते सातत्याने बाजू लावून धरत.
नागपूर दक्षिण पश्चिमच्या लोकांनीही त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना आपला लोकप्रतिनिधी म्हणून राज्याच्या राजकारणात साथ दिली परंतु मुख्यमंत्री झाल्यापासून व त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाल्यापासून फडणवीस यांनी विदर्भाच्या प्रश्नांकडे फारसे लक्ष दिलेले नाही.” असं अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी म्हटलं आहे.

”मागील दोन अडीच वर्षात तर त्यांनी विदर्भातील धानाचा मुद्दा, बरोजगारीचा मुद्दा, भेल सारखा मोठा प्रकल्प बंद पडला तो मुद्दा असो वा विदर्भ आणि नागपूरबाबत कोणताच मुद्दा उपस्थित केला नाही.
मुख्यमंत्री असतानाही 2 आठवड्यांपेक्षा जास्त नागपूरचे अधिवेशनही त्यांनी घेतले नाही.
आता ते विदर्भ व नागपूरला विसरले असून मुंबई, दिल्लीच्या राजकारणात रमले आहेत.
फडणवीस यांनी नागपूर व विदर्भाच्या जनतेच्या विश्वासाला तडा दिला असून आता त्यांनी नागपूरमधून नाही तर मुंबईतून निवडणूक लढवावी.” असं ते म्हणाले.

 

दरम्यान, ”आपले नेतृत्व उभे करण्यासाठी विदर्भ व नागपूरच्या जनतेचा वापर करुन घेतला असून हा घोर अपमान विदर्भ व नागपूरकर जनता कधीही विसरणार नसल्याचंही,” अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Atul Londhe | nagpurs devendra fadnavis lost in mumbais blaze forgot vidarbha atul londhes scathing remarks

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा