अतुल म्हेत्रे पुरंदरचे कार्यक्षम तहसीलदार : उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुरंदर तालुक्याचे कार्यक्षम तहसीलदार अतुल म्हेत्रे यांनी योग्य नियोजन करून जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, उपविभागीय कार्यलय दौंड – पुरंदर तसेच सर्वांच्या सहकार्याने सासवड येथे महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी महसूलचे अधिकारी, कर्मचारी यांची आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या महत्वाचा कणा असणाऱ्या या विभागात तहसीलदार पासून कोतवाल पर्यंत उत्कृष्ठ काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांचे व मान्यवरांचा सत्कार करून त्यांना नवीन ऊर्जा देण्याचे काम करून महसूल दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख म्हणाले की चांगले काम करणारा कर्मचारी येथून पुढे या नोकरीत टिकेल. वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांना मदत करायला तयार असतात. माझ्याकडे येणाऱ्या माणसाचे जर मी काम करु शकत नसेल तर माझा त्या ठिकाणी काम करण्यात काय अर्थ आहे. मी जर त्याला मदत करू शकलो तर माझ्या तिथे काम करण्यास अर्थ आहे. याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. शेतकऱ्यांना आपल्याला मदत करता आली पाहिजे. त्यांना त्रास झाला नाही पाहिजे. आपण सरकारी नोकरीत आहोत हे आपले नशीब आहे.

पुरंदरचे तहसीलदार अतुल म्हेत्रे यांच्या कामकाजाबाबत बोलताना विजयसिंह देशमुख म्हणाले ते कार्यक्षम असून त्यांची काम करण्याची पध्दत चांगली आहे. त्याच्यावर कोणतीही जबाबदारी सोपवल्यास ते प्रामाणिकपणे पार पाडतात. पुरंदर तालुक्याचे कामकाज चांगले आहे. ते सर्वांना विश्वासात घेऊन काम करतात. त्यांनी राबविलेला आरोग्य तपासणी हा उपक्रम अतिशय चांगला असून कौतुकास्पद आहे. प्रास्तविक करताना तहसीलदार अतुल म्हेत्रे म्हणाले शासन लोकांच्या हितासाठी जे निर्णय घेते ते तळागाळातील लोकांच्या पर्यंत पोहचविण्याचे काम आपण करत असतो. मला येऊन ११ महिने झाली. मी आल्यानंतर सर्वच कर्मचारी अधिकारी चांगले पळाले आहेत. त्यांची आरोग्य तपासणी करणे हे मला योग्य वाटले म्हणून हे नियोजन केले. शासनाच्या सर्व योजनांचा लाभ तळागाळातील लोकांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. मी कामासाठी तुमच्या मागे लागत असलो तरी तुमचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी जिल्हाधिकारी यांचे सहकार्य लाभले.

यावेळी रक्तदान शिबिरात तहसीलदार सह, नायब तहसिलदार, मंडलाधिकरी, तलाठी, कोतवाल, रेशन दुकानदार, पत्रकार, पोलीस पाटील आदी सहभागी होऊन ५४ जणांनी रक्तदान केले. यावेळी प्रांत प्रमोद गायकवाड, नायब तहसिलदार रमेश शेळके, सूर्यकांत पठाडे, पुरंदर केमिस्ट ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, सासवड ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ उर्मिला चिकणे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ प्रविण जगताप, पुरवठा अधिकारी बडदे तसेच मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन तलाठी निलम देशमुख यांनी केले. तर आभार नायब तहसिलदार सूर्यकांत पठाडे यांनी मानले.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like