PM मोदींना मिळालेल्या 2772 भेट वस्तूंचा आज पासुन ‘लिलाव’, ‘नमामि गंगे’स दिली जाणार रक्‍कम, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या 2,772 भेटवस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे. येत्या 14 सप्टेंबर रोजी या भेटवस्तूंचा ऑनलाईन लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावातून मिळणारी रक्कम केंद्र सरकारतर्फे गंगेच्या स्वच्छतेसाठी असलेल्या ‘नमामी गंगे’ या मोहिमेच्या कामात वापरण्यात येणार आहे.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या 2,772 भेटवस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे. गेल्या सहा महिन्यांत पंतप्रधान मोदींना अनेक ठिकाणाहून अनेक भेटवस्तू मिळाल्या आहेत. त्या लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत. हा लिलाव 3 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या भेटवस्तू सामान्य नागरिकांनांही खरेदी करता येतील. या भेटवस्तूंची किंमत 200 रुपयांपासून सुरू होत आहे आणि भेटवस्तूंची सर्वाधिक रक्कम 2.5 लाख रुपये इतकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यापूर्वी मिळलेल्या जवळपास 1800 भेटवस्तूंचा काही दिवसांपूर्वीच लिलाव करण्यात आला होता. आता पुन्हा भेटवस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे.

असा होईल लिलाव
या ई-लिलावाविषयी, संस्कृती व पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल म्हणाले की, १४ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान ई-लिलावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे आणि पीएम मोदी यांना प्राप्त भेटवस्तू या दिवशी नागरिक खरेदी करू शकतील. मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या मते पंतप्रधान मोदींकडून मिळालेल्या वस्तूंची किमान किंमत २०० रुपये असेल तर सर्वाधिक किंमत अडीच लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

याआधीही झाला होता लिलाव
मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी जानेवारी महिन्यात पंतप्रधान मोदींकडून मिळालेल्या १८०० हून अधिक भेट लिलावाच्या माध्यमातून विकल्या गेल्या. पीएम मोदी यांनी जानेवारी २०१९ मध्ये ज्या भेटवस्तूंचा लिलाव केला त्यापैकी एक पेंटिंग आणि लाकडी दुचाकीची प्रत प्रत्येकी पाच लाख रुपयांमध्ये लिलाव करण्यात आली. जानेवारीत झालेला हा लिलाव दोन दिवस चालला. पंतप्रधान मोदींना भेट म्हणून दिलेली भगवान शिवाची एक प्रतिमा १० लाख रुपयांना विकली गेली. त्याची किमान किंमत पाच हजार रुपये ठेवली गेली होती. लिलावाच्या शेवटच्या दिवशी १९०० पैकी २७० वस्तूंचा लिलाव झाला.

You might also like