Auction Sealed Properties PMC Property Tax Due | मिळकतकर थकल्याने सील केलेल्या मिळकतींचा लवकरच लिलाव; महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती

सील केलेल्या 1400 पैकी 200 मिळकतींचा होणार लिलाव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Auction Sealed Properties PMC Property Tax Due | पुणे शहरातील मिळतदारांनी थकवलेल्या थकबाकीमुळे महापालिकेने 1400 मिळकती सील केल्या आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात 200 मिळकतींचा लिलाव करण्याचा निर्णय महापालिकेने घतेला असून ही प्रक्रिया ऑक्टोबर महिन्यात सुरु केली जाणार आहे. तसेच मिळकतकराचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मिळकतकर विभागासाठी अतिरिक्त कंत्राटी मनुष्यबळ उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली. (Auction Sealed Properties PMC Property Tax Due)

महापालिकेला मिळकतकरातून उत्पन्न मिळत असते. मागील आर्थिक वर्षामध्ये पालिकेला मिळकतकरातून दोन हजार कोटी पेक्षा अधिक उत्पन्न मिळाले होते. त्या तुलनेत यंदाच्या वर्षी कमी उत्पन्न पालिकेला मिळाले आहे. त्यामुळे महापालिकेने थकबाकीदारांकडे आपला मोर्चा वळवला असून थकबाकी न भरणाऱ्या मिळकती जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या मिळकतींचा लिलाव केला जाणार आहे. (Auction Sealed Properties PMC Property Tax Due)

जे मिळकतदार मिळकत कर भरत नाहीत अशांवर महापालिकेकडून दरमहा दोन टक्के शास्तीची (दंड) कारवाई केली जाते. आर्थिक वर्ष संपल्यानंतर जे मिळकतदार कर भरत नाहीत अशांना नोटीस पाठवून कर भरण्यास सांगितले जाते. मात्र त्यानंतरही मिळकत कर न भरणाऱ्या मिळकतदारांची मालमत्ता सील केली जाते. अशा प्रकारे महापालिकेने आतापर्यंत तब्बल 14 हजार मिळकती सील केल्या आहेत, असे विक्रम कुमार यांनी सांगितले.

महापालिकेने मिळकतकर थकबाकीपोटी आतापर्य़ंत 1400 मिळकती सील केल्या असल्या तरी आणखी 30 हजार व्यावसायिक मिळकतींचा मिळकतकर थकित आहे. या मिळकती सील करण्याची प्रक्रिया तातडीने सुरु केली जाणार आहे. त्यानंतर त्यांचाही लिलाव केला जाईल, असे विक्रम कुमार यांनी सांगितले.

सील केलेल्या मिळकतींचा लिलाव केला जाणार आहेत. याशिवाय करवसुलीचे उद्दिष्टही साध्य करायचे
असल्याने मिळकतकर विभागाला अतिरिक्त कंत्राटी मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिली आहे.
तसेच मिळकतकर थकबाकीच्या न्यायप्रविष्ट प्रकरणांना गती मिळण्यासाठी कंत्राटी वकिलांच्या संख्येत वाढ
केली जाईल, असेही विक्रम कुमार यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Khadakwasla To Phursungi Water Tunnel | खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान कालव्या ऐवजी
बंद पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा योजनेत एक पाउल पुढे; प्रकल्प राबविल्यास
मुठा उजव्या कालव्यावर २७ कि.मी. पर्यायी रस्ता तयार होणार !

ACB Trap Case | 35 हजार रुपये लाच घेताना जिल्हा जात पडताळणी समितीचा कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

MP Pragya Thakur-SPL NIA Court | मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सहा आरोपी एनआयए कोर्टात हजर