Audi Q3 accident | दुर्दैवी ! ऑडी कारच्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू; आमदाराच्या मुलासह सुनेचा समावेश

बेंगळुरु : वृत्तसंस्था – Audi Q3 accident | भरधाव वेगात आलेल्या ऑडी कार झाडावर जोरात धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. हा धक्कादायक अपघात (Accident) बेंगळूर (Bangalore) येथे झाला आहे. या दुर्घटनेत 7 जणांचा बळी (Died) गेल्याची माहिती समोर आलीय. ही घटना मध्यरात्री दीडच्या दरम्यान घडली आहे. (Audi Q3) ही कार रस्त्याकडेला असणाऱ्या झाडाला जोरात धडकल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात मृत्यू झालेल्यात 4 पुरुष आणि 3 महिला आहेत.

 

 

 

याबाबत माहिती अशी, ऑडी कारच्या (Audi Q3) अपघातात मृत्यू झालेल्यामध्ये कर्नाटकातील आमदार पुत्राचा आणि सुनेचा समावेश आहे. डीएमके आमदार वाय प्रकाश (DMK MLA Y. Prakash) यांनी याबाबत माहिती दिली आहे. करुणा सागर (Karuna Sagar) असं मुलाचे नाव असून बिंदू (Bindu) असं सुनेचं नाव आहे.

दरम्यान, कारचा अपघात मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये 7 जण दगावले आहेत. तर, त्या ऑडी कारमध्ये तिघे जण पुढच्या सीटवर बसले होते. तसेच, चौघे मागच्या सीटवर होते. यामधील मृतांचे वय साधारण 20 ते 30 च्या दरम्यान असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. या अपघाताची नोंद स्थानिक वाहतूक पोलिसांनी केलीय.

हे देखील वाचा

Police Inspector Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलातील 4 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

PMSYM | 2 रुपये खर्च करून ज्येष्ठांना होऊ शकतो मोठा लाभ ! दरमहिना खात्यात येईल इतकी रक्कम, जाणून घ्या सविस्तर

Anil Parab | आता शिवसेना नेते अनिल परबांच्या मागे ED चा ससेमिरा; 3 मालमत्तांवर छापेमारी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Audi Q3 accident | audi hits tree seven die in bengaluru including mla son and daughter in law

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update