सावधान ! ‘कोरोना’ व्हायरस संबंधित ‘हा’ ऑडिओ शेअर केल्यास कारवाई

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसमुळे जगात दहशत माजली आहे. आतापर्यंत 21 हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर यामुळे लाखो लोक संक्रमित झाले आहेत.भारतात कोरोनामुळे मृतांचा आकडा 16 वर पोहोचला आहे. यादरम्यान सोशल मीडियावर लोक फेक मेसेज शेअर करताना दिसत आहेत. या अशा फेक मेसेजचे प्रमाण वाढले आहे. याद्वारे लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न होत आहे.

या दरम्यान सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे, ज्यात दावा आहे की नागपूरमध्ये आतापर्यंत 59 लोक कोरोनाग्रस्त झाले आहेत, ज्यात डॉक्टरांचा देखील समावेश आहे, सरकारने मात्र हा मेसेज फेक असल्याचे सांगितले आहे.

काय आहे या ऑडिओ क्लिपमध्ये –
4.52 मिनिटांच्या या ऑडिओ मध्ये दोन लोक फोनवर अपापसात बोलत आहेत. यात नागपूरमधील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यावर चर्चा सुरु आहे आणि दावा आहे की यात डॉक्टर देखील कोरोनाग्रस्त झाले आहेत. परंतु सरकारने हा दावा खोटा ठरवला आहे. म्हणजे हा मेसेज फेक असेल.

सावधान –
जर तुम्ही हा मेसेज अद्यापही तुमच्या मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये फॉरवर्ड करत असाल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

फेक मेसेजपासून सावध –
कोरोना व्हायरससंबंधित जागरुकता निर्माण करणारे फेक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यासाठी भारत सरकारने व्हॉट्सअ‍ॅप चॅटबोट ‘MyGov Corona Helpdesk’ तयार करण्यात आला आहे. यावर तुम्ही कोविड – 19 संबंधित प्रश्न विचारु शकतात. ज्याद्वारे तुम्ही अशा फेक मेसेजपासून वाचू शकतात.