भाजपच्या ‘या’ मंत्र्याला पाडा, भाजपच्याच पदाधिकाऱ्यांचा ऑडिओ व्हायरल ; भाजपमध्ये खळबळ

गाझियाबाद : वृत्तसंस्था – निवडणुकीच्या तोंडावरच भाजपचे अंतर्गत वाद समोर आले आहे. केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंग यांना येत्या निवडणुकीत गाझियाबाद मधून पाडा असा ऑडिओ व्हायरल झाला आहे. व्ही. के. सिंग यांना पाडा म्हणणारे सुद्धा भाजपाचेच पदाधिकारी असल्याचे समोर आले आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ११ एप्रिल रोजी देशातील पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान, २०१४ प्रमाणेच याही लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपा पूर्ण ताकद लावत आहे. मात्र भाजपाचे अंतर्गत वाद अजूनही संपले नसल्याचे दिसून येत आहे. गाझियाबाद लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार व्ही. के. सिंग यांना येत्या निवडणुकीत पाडा अशी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ मध्ये दोन व्यक्तींमध्ये चारचा होत आहे. तर या क्लिप मध्ये भाजपामध्ह्ये होणारी घुसखोरी तसेच स्वकृत सदस्य बनवण्यासाठी पैसे वसुली आणि भाजपाचे उमेदवार व्ही. के. सिंग यांना येत्या निवडणुकीत पाडा त्यानंतर पार्टी करू शी चारचा करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, ही ऑडिओ क्लिप भाजपचे बेटी बचाओ-बेटी पढ़ाओचे महानगर सह संयोजक कुलदीप शर्मा यांची आहे. मात्र संजीव शर्मा आणि त्यांचे जवळचे पप्पू पहेलवान व्ही. के. सिंग यांना पाडण्यासाठीचे मुख्य सूत्रधार असल्याचे कुलदीप शर्मा यांनी म्हंटले आहे. त्यावेळी संजीव शर्मा यांनी हे आमचे कारस्थान नसून मानसिंग गोस्वामी यांचे कारस्थान आहे असे सांगत कुलदीप शर्मा यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहे. भाजपच्या या अंतर्गत वादामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.