home page top 1

पाकिस्तानचा ना’पाक’ विचार ! 15 ऑगस्टला ‘काळा’ दिवस जाहिर, प्रसारमाध्यमांना ‘पत्रक’ काढून कळवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक भारतीय आनंदाने या दिवशी देशसेवेचे गोडवे गातो. मात्र पाकिस्तानला हा दिवस कदाचित आवडत नसावा म्हणूनच पाकिस्तानने अजिब फतवा काढला आहे. १५ ऑगस्ट हा काळा दिवस म्हणून जाहीर करण्यात आला आहे. पाकिस्तान सरकारने या संदर्भातले एक पत्रकच जारी केले आहे.

सॅटेलाईट टीव्ही चॅनल्स, एफएम रेडिओ चॅनल्स या सगळ्यांना ही सूचना पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. १५ ऑगस्टच्या दिवशी कोणताही विशेष कार्यक्रम करायचा नाही. काश्मीरसंदर्भात आत्मियता असलेल्या बातम्या आणि व्हिडिओच प्रसारित करावेत असंही या पत्रकात पाक सरकारने म्हटलं आहे. १४ ऑगस्ट हा आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन आहे. हा दिवस आपल्या काश्मीरच्या एकतेचं प्रतीक म्हणून साजरा केला जावा असंही पाक सरकारने म्हटलं आहे.

१५ ऑगस्ट हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्यासाठी पाकिस्तान सरकारने या दिवशी झेंडाही अर्ध्यावर आणण्याचे आवाहन जनतेला केले आहे. तसेच भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या भूमिका काय आहेत हे दाखवणारे व्हिडिओज दाखवले जावेत. इतकंच नाही तर पाकव्याप्त काश्मीरबाबत पाकिस्तानची भूमिका काय तेही स्पष्ट करावे असेही निर्देश देण्यात आले आहेत.

भारताने कलम ३७० पाकिस्तानमधून रद्द केल्यामुळे पाकिस्तानची चांगलीच जळफळाट झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे, नुकत्याच चीनच्या दौऱ्यावर असलेल्या पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांना सोशल मीडियावरती चांगलेच ट्राेल व्हावे लागले होते.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like