Aundh Pune Crime | वाद मिटवण्यासाठी बोलावून घेत ब्लेडने केले वार, औंध मधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Aundh Pune Crime | जुने वाद मिटवण्यासाठी तरुणाला बोलावून घेत त्याच्यावर ब्लेडने सपासप वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना औंध परिसरात घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.11) रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास डी.पी. रोडवरील (DP Road Aundh) अमेय बिल्डिंग जवळ घडली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshrungi Police) 26 वर्षाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत ऋतिक प्रकाश तडके (वय-24 रा. डी.पी. रोड औंध) याने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन राकेश कांबळे (वय-26 रा. पी.एम.सी. बिल्डींग, औंध) याच्यावर आयपीसी 324, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यात यापूर्वी अनेक वेळा वाद झाले आहेत. याचा राग मनात धरुन आरोपीने ऋतिक याला वाद मिटवण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. ऋतिक घराच्या खाली आला असता आरोपीने त्याला शिवीगाळ केली. तसेच सोबत आणलेल्या ब्लेडने ऋतिच्या मानेवर वार करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पत्नीवर चाकूने वार

पुणे : सोबत राहत नसल्याच्या कारणावरुन पतीने पत्नीला शिवीगाळ करुन चाकूने वार करुन जखमी केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार आंबेगाव बुद्रुक (Ambegaon Budruk) येथील एका हॉटेलच्या बाहेरील पार्कींगमध्ये गुरुवारी (दि.11) सायंकाळी साडेसात वाजता घडला आहे. याबाबत 32 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन आरोपी पतीवर आयपीसी 324, 504, 506 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी या ऑफिसचे काम संपवून दुचाकी घेण्यासाठी पार्कींग येथे आल्या असता आरोपी त्याठिकाणी आला. माझ्या सोबत का राहत नाही अशी विचारणा करुन त्याने पत्नीसोबत वाद घातला. आरोपीने सोबत आणलेला चाकु बाहेर काढून शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच हातातील चाकूने फिर्यादी यांच्या हातावर मारुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lok Sabha Election In Maharashtra | बारामती, रायगडसह 11 मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी प्रक्रिया सुरू; 7 मे रोजी मतदान

Mundhwa Pune Crime | पुणे : प्रेमाच्या जाळ्यात ओढले, लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर बलात्कार