ADV

Aundh Pune Crime News | पुणे : औंध परिसरात दरोड्याच्या उद्देशाने तिघांना रॉडने मारहाण, ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Aundh Pune Crime News | औंध परिसरात परिहार चौकात (Parihar Chowk Aundh) मॉर्निंग वॉक आणि सायकलवर ऑफिसचे काम करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना सहा जणांच्या टोळक्याने दरोड्याच्या उद्देशाने (Robbery Case) लोखंडी रॉडने मारहाण करत लुटण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी तीन जणांवर हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.(Aundh Pune Crime News)

समीर रॉय चौधरी (वय-77 रा. सायली गार्डन सोसायटी, औंध) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत श्रेयस सतीश शेट्टी (वय-30 रा. अश्विनी सोसायटी, औंध रोड, खडकी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन 20 ते 25 वयोगटातील आरोपीविरोधात आयपीसी 397, 307, 341 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत रामसोबीतकुमार ठक्कु मंडल (वय-38 रा. मंगलम कन्स्ट्रक्शन साईट, परिहार चौक, औंध) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मेडी पॉईंट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिहार चौकात परिसरातील नागरिक सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी येत असतात.
गुरुवारी पहाटे सहा जणांच्या टोळक्याने लुटण्यासाठी तिघांना टार्गेट केले. त्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.
यामध्ये समीर चौधरी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना एका पेपर विक्रेत्याने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना गुरुवारी सकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभा मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर,
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी,
युनीट चारचे पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस निरीक्षक गुन्हे युवराज नांद्रे, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील,
राजकुमार केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे युवराज नांद्रे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी: 12 रुपये पाठवण्यास सांगून ज्येष्ठ नागरिकाला 3 लाखांचा गंडा

Pune Crime News | पुणे: चौकशीसाठी बोलावून महिलेला पोलीस ठाण्यात ‘थर्ड डिग्री’ टॉर्चर, पोलीस उपनिरीक्षक व 5 पोलीस कर्मचाऱ्यांसह 9 जणांवर FIR