Pune : औंध-सांगवी जुना पूल ६ जानेवारी २०२१ पर्यंत वाहतुकीसाठी बंद

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – औंध-सांगवी येथील जुन्या पुलाशेजारी नवीन पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. या औंध-सांगवी जुना पूल ६ जानेवारी २०२१ पर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. वाहतूक पोलिसांनी या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे.

औंध-वाकड-सांगवी रस्त्यावरील जुन्या पुलाशेजारी नव्याने पूल बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम ६ जानेवारी २०२१ पर्यंत सुरु राहणार आहे. यामुळे वाहतूक पोलिसांकडून या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जुना पूल बंद ठेवण्यात येणार असून, या परिसरात वाहतूक बदल करण्यात आले असल्याचे वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे सांगितले आहे. वाहन चालकांनी पोलिसांच्या सुचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

असा आहे बदल..
सांगवीहून वाकडकडे जाणारी वाहतूक भाले चौक, परिहार चौक, ॠषी मल्होत्रा चौक, राजीव गांधी पूलमार्गे सोडण्यात येणार आहे.
सांगवीहून वाकडकडे जाणारी वाहने भाले चौक, नागरस रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतू मार्गे इच्छित स्थळी पोहचतील.

हडपसरमध्ये काही भागात नो पार्किंग
हडपसर परिसरात काही ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्याचे मुख्य कारण म्हणजे, बेशिस्तपणे वाहने पार्किंग करणे हे कारण आहे. यामुळे वाहतूक विभागाने काही भागात नो पार्किंग केली आहे. त्यात सावली कॉर्नर, पुणे-सोलापूर रोड ते विलु पुनावाला हॉस्पिटलपर्यंत नो पार्किंग करण्यात आली आहे.