home page top 1

मोठी बहिण रागावल्याने 14 वर्षीय मुलीची विहिरीत उडी मारून आत्महत्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – मोठ्या बहिणीचं रागावणं सहन न झाल्याने 14 वर्षीय मुलीने विहरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिल्पा रामकुमार धनगावकर असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव असून ती आठवी इयत्तेत शिकत होती. औरंगाबाद शहरातील हडको एन-11 परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभ्यास करत नसल्याने शिल्पा हिची मोठी बहिण तिच्यावर रागावली. बहिणीचे रागावणे सहन न झाल्याने तिचे आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. बुधवारपासून ती घरातून बेपत्ता होती.

हडको परिसरातील बाळासाहेब ठाकरे उद्यानात आज सकाळी काही नागरिकांना शिल्पाचा मृतदेह विहिरीतील पाण्यात तरंगताना दिसला. त्यांनी ग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तिचा मृतदेह बाहेर काढला.

Visit – policenama.com 

Loading...
You might also like