home page top 1

पोहायला गेलेल्या २ शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – पोहायला गेलेल्या चार शाळकरी विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना औरंगाबादमधील नक्षत्रवाडी परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रदीप भगवान काजळे (वय-९) आणि तुषार प्रकाश शिरसाठ (वय-१२) अशी मृत्यू झालेल्या शाळकरी विद्यार्थ्यांची नावे आहेत.

नक्षत्रवाडी परिसरात चार शाळकरी विद्यार्थी शुक्रवारी सायंकाळी फिरायला गेले होते. या ठिकाणी असलेल्या खदाणीमध्ये पोहण्याचा मोह न आवरल्याने तुषार आणि प्रदीपने पाण्यात उड्या मारल्या. पाण्यात उड्या मारल्यानंतर ते दोघे वर न आल्याने त्यांच्यासोबत असलेले मित्र घाबरले. त्यांनी तेथून पळ काढला. मात्र, तुषार आणि प्रदीप पाण्यात बुडले असल्याचे त्यांनी गावातील कोणाला सांगितली नाही.

दरम्यान, फिरायला गेलेली मुले अद्याप घरी आले नसल्याने त्यांच्या पालकांनी त्यांचा शोध घेतला. मुले खदाणीमधील पाण्यात बुडाले असल्याची माहिती मुलांच्या नातेवाईकांना मिळताच गावकऱ्यांनी खदाणीच्या दिशेने धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होईपर्य़ंत दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंसह इतरांवर अ‍ॅट्रोसीटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश

मराठा आरक्षण झाले आता धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण हेच ध्येय : सुनिता गडा

त्वचेच्या बचावासाठी ‘वॉटर थेरपी’ ठरू शकते लाभदायक

पाच सोपे उपाय, ज्यामुळे तुमचे ‘वजन’ होईल कमी

 

Loading...
You might also like