३० हजार रूपयाची लाच स्विकारताना पोलिस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हयातील गंगापूर येथील पोलिस उपनिरीक्षकास ३० हजार रूपयाची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षकास तब्बल ३० हजाराची लाच घेताना अटक झाल्याने संपुर्ण पोलिस दलामध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे असे लाच घेणार्‍या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

याबाबत तक्रारदाराने औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचला. सरकारी पंचासमक्ष पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांनी तक्रारदाराकडून ३० हजार रूपये स्विकारले. त्यानंतर अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरूध्द गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे.

शासकीय सेवक अथवा लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत नागरिकांनी अ‍ॅन्टी करप्शन कार्यालयात तक्रार करावी अन्यथा टोल फ्री नंबर १०६४ वर संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.

सर्दीची ‘अ‍ॅलर्जी’ का होते ? जाणून घ्या यामागील कारणे

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

रोहित पवार या मतदारसंघातून लढणार

पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी प्या, आरोग्य सुधारेल

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like