Aurangabad ACB Tap | लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्ह्यात मदत करण्यासाठी 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी 10 हजार रुपयांचा हप्ता स्वीकारला. त्यानंतर उर्वरित 15 हजार रुपयांचा हप्ता स्वीकारताना बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्याला औरंगाबाद लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने (Aurangabad ACB Tap) सापळा रचून रंगेहात पकडले. औरंगाबाद एसीबीने (Aurangabad ACB Tap) ही कारवाई सोमवारी (दि.5) केली. पोलीस उपनिरीक्षक राजू भानुदास गायकवाड (वय 53), पोलीस अंमलदार विकास सर्जेराव यमगर असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोन पोलिसांची नावे आहेत. याबाबत 55 वर्षीय व्यक्तीने औरंगाबाद एसीबीकडे (Aurangabad ACB Tap) तक्रार केली आहे.

तक्रारदार यांच्यावर दाखल गुन्ह्यात मदत करून बी फायन पाठवण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक राजू गायकवाड व पोलीस अंमलदार विकास यमगर यांनी 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 25 हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यापैकी तक्रारदार यांनी 10 हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला आहे. उर्वरित 15 हजार रुपयांची मागणी गायकवाड व यमगर यांनी केली. तक्रारदार यांनी औरंगाबाद एसीबीकडे याबाबत तक्रार केली.

औरंगाबाद युनिटने पंचासमक्ष पडताळणी केली असता, तक्रारदार यांच्यावर दाखल गुन्ह्यात मदत करून बी फायन
पाठवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 30 हजार रुपये लाचेची मागणी केली.
तसेच पहिला हफ्ता 10 हजार रुपये घेऊन उर्वरित रक्कम 15 हजार रुपये गायकवाड व यमगर यांनी
मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सोमवारी सापळा रचून दोघांना तक्रारदार यांच्याकडून 15 हजार रुपये
लाचेची रक्कम घेताना रंगेहात पकडले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उपअधीक्षक दिलीप साबळे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गोरखनाथ गांगुर्डे, पोलीस नाईक दिगंबर पाठक, शिरीष वाघ,
भीमराज जिवडे, चांगदेव बागुल यांच्या पथकाने केली.

Web Title :- Aurangabad ACB Tap | Aurangabad ACB Tap PSI Raju Bhanudas Gaikdwad Of Shivaji Nagar Police Station Aurangabad Bribe Case Arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Property Tax | मिळकत करातील 40 टक्के सवलत पूवर्वत करण्याचे पालकमंत्र्यांचे आश्‍वासन हवेतच?

Shambhuraj Desai | “आमची हिंमत पाच महिन्यांपूर्वीच दाखवली”; संजय राऊतांच्या टीकेला शंभूराज देसाईंचे प्रत्युत्तर