Aurangabad ACB Tap | जप्त केलेली दुचाकी देण्यासाठी लाच घेणारा पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – अपघात झाल्यानंतर जमा करून घेतलेली दुचाकी परत देण्यासाठी एक हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) पोलीस हवालदाराला औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Aurangabad ACB Tap) सापळा रचून रंगेहात पकडले. औरंगाबाद एसीबीने (Aurangabad ACB Tap) ही कारवाई गुरुवारी (दि.8) औरंगाबाद शहरातील सातारा पोलीस ठाण्यात (Satara Police Station) केली.

 

पोलीस हवालदार तेजराव शंकरराव गव्हाणे Tejrao Shankarao Gavhane (वय 57) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत 55 वर्षांच्या व्यक्तीने औरंगाबाद एसीबीकडे (Aurangabad ACB Tap) तक्रार केली आहे.

 

तक्रारदार यांच्या मुलाचा अपघात झाल्याने औरंगाबाद शहरातील सातारा पोलीस ठाण्यात दाखल एमएलसीमध्ये तक्रारदार यांची जमा असलेली मोटारसायकल सोडण्यासाठी पोलीस हवालदार (Police Constable) तेजराव गव्हाणे यांनी एक हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी औरंगाबाद लुचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

औरंगाबाद एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता, पोलीस हवालदार तेजराव गव्हाणे यांनी गाडी सोडवण्यासाठी एक हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
गुरुवारी सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून एक हजार रुपये लाचेची रक्कम घेताना गव्हाणे यांना रंगेहात पकडण्यात आले.
त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole),
अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe),
पोलीस उपअधीक्षक दिलीप साबळे (DySP Dilip Sable) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा सौदागर
(Police Inspector Reshma Saudagar), पोलीस अंमलदार रवींद्र काळे, सुनील पाटील, सुनील बनकर,
दत्ता होरकटे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Aurangabad ACB Tap | Policeman who took bribe to hand over seized bike in anti-corruption trap

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | एसबीआय बँकेत नोकरीच्या बहाण्याने तरुणाची 5 लाखांची फसवणूक; ताडीवाला रोड परिसरातील घटना

Gujarat Election results | “गुजरात जिंकलात आता महाराष्ट्र होऊन जाऊ दे”; आदित्य ठाकरेंचे भाजपला आव्हान

Navneet Rana | संजय राऊतांना आलेल्या धमकीची चौकशी झाली पाहिजे; त्यांची वक्तव्ये म्हणजे…