×
Homeअ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)Aurangabad ACB Trap | गाडी सोडविण्यासाठी 5 हजारांची लाच मागणारा पोलीस अटकेत

Aurangabad ACB Trap | गाडी सोडविण्यासाठी 5 हजारांची लाच मागणारा पोलीस अटकेत

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन  – बजाज फायनान्स कंपनीने गाडीचे हफ्ते थकले म्हणून एका इसमाची गाडी त्याला मारहाण करत जप्त करुन नेल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये घडला आहे. याप्रकरणी दुचाकीच्या मालकाने पोलिसांत तक्रार दिली असता, तेथील पोलिसाने त्यांच्याकडे गाडी सोडवून देण्यासाठी पाच हजारांची लाच (Aurangabad ACB Trap) मागितल्याचा प्रकार देखील उघडकीस आला आहे. याप्रकरणी औरंगाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागास (Aurangabad ACB Trap) तक्रार देण्यात आली. त्यानुसार विभागाने कारवाई करत लाचखोर पोलीस नाईकास ताब्यात घेतले आहे.

 

बजाज फायनान्स कंपनीच्या वसुली पथकाच्या लोकांनी मारहाण करुन दुचाकी नेल्याने तक्रारदार यांनी पोलिसांत धाव घेतली. पण त्यांना दुचाकी सोडवून देण्यासाठी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक आरोपी प्रकाश धोंडीबा सोनवणे (वय – 49) यांनी पाच हजारांची लाच मागितली. त्यानुसार पथकाने सापळा रचत सोनवणे यास पाच हजार रुपये लाच पंचासमोर स्वीकारताना रंगेहात पकडून अटक केली.

 

सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदिप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे,
पोलीस उप अधीक्षक मारूती पंडित, पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, पोलीस अंमलदार सुनील पाटील,
राजेंद्र जोशी, विलास चव्हाण, अशोक नागरगोजे, चालक चांगदेव बागूल यांनी केली.

 

Web Title :- Aurangabad ACB Trap | A policeman who demanded a bribe of 5 thousand to fix the car was arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gulabrao Patil On Aditya Thackeray | ‘आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरले असते तर त्यांना बिहारमध्ये जाण्याची वेळ आली नसती’

MLA Pratap Sarnaik | शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांकडून तुळजाभवानीच्या चरणी 75 तोळे सोने अर्पण

FIFA World Cup 2022 | पेलेनंतर स्पेनचा गॅवी ठरला विश्वचषकात गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू

Maharashtra Politics | पाच महिने होऊनही आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी लटकलेलीच; कायद्यात वेळेचे बंधन नसल्याने विधानसभेच्या अध्यक्षांचा वेळ काढूपणा?

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News