Aurangabad ACB Trap | घरावर मीटर बसविण्यासाठी 16 हजारांची लाच मागणारा अधिकारी जाळ्यात

औरंगाबाद: पोलीसनामा ऑनलाइन – घरावर मीटर बसविण्यासाठी 16 हजारांची लाच (Aurangabad ACB Trap) मागितल्याचा प्रकार औरंगाबाद जिल्ह्यात घडला आहे. याप्रकरणी औरंगाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागास तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार कारवाई करत लाचखोर (Aurangabad ACB Trap) अधिकाऱ्यास रंगेहात पकडत बेड्या ठोकल्या आहेत.

 

विभागाच्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी त्यांच्या घरावर शेडचे बांधकाम केले. त्याठिकाणी नवीन मीटर बसवून मिळण्यासाठी विभागास अर्ज केला. पण हा मीटर बसवून देण्यासाठी आरोपी साहेबराव बाबाराव घुगे (वय – 34, रा. डी 2, श्रीकृष्ण रेसिडेन्सी, पिसादेवी ता. जि. औरंगाबाद) यांनी 16,200 रुपयांची लाच मागितली. या प्रकरणाची माहिती विभागास मिळाल्यावर विभागाने सापळा रचत घुगे यांना पंचांसमोर लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप राजपूत,
अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उप अधीक्षक मारूती पंडित, पोलीस अंमलदार सुनील पाटील,
केवल गुसिंगे, दत्ता होरकटे यांनी केली.

 

Web Title :- Aurangabad ACB Trap | An officer who demanded 16 thousand to install a meter at the house is in the net

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule On Devendra Fadnavis | सुप्रिया सुळेंचं उपमुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून विधान, म्हणाल्या – ‘हा यू टर्न आता चालणार नाही’

Pune Rural Police | अल्पवयीन मुलांना वाहन देणे पालकांना पडले महागात, पोलिसांकडून पालकांवर खटले दाखल

Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Issue | महाराष्ट्रातील 40 गावे कर्नाटकात जाणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…