Aurangabad ACB Trap | 50 हजार रुपये लाच घेताना भविष्य निर्वाह कार्यालयातील वेतन अधीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मेडिकल बिल (Medical Bill) तयार करुन ते मंजुरीसाठी ट्रेझरी कार्यालयात (Treasury Office) पाठवण्यासाठी 50 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) प्राथमिक, भविष्य निर्वाह निधी पथक वेतन वितरक कार्यालय जिल्हा परिषद औरंगाबाद येथील वेतन अधीक्षकाला औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Aurangabad ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. दिलीप परशराम जऊळकर Dilip Parasharam Jeweller (वय 50) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या वेतन अधीक्षकाचे नाव आहे. औरंगाबाद एसीबीने (Aurangabad ACB Trap) ही कारवाई बुधवारी (दि..8) केली.

 

याबाबत 40 वर्षाच्या व्यक्तीने सोमवारी (दि.6) औरंगाबाद एसीबीकडे (Aurangabad ACB Trap) तक्रार केली होती. तक्रारदार यांच्या वडिलांचे व पत्नी यांचे एकूण 14 मेडिकल बिल दिलीप जऊळकर यांच्याकडे प्रलंबित होते. मेडिकल बिल तयार करून मंजूरी करिता ट्रेझरी कार्यालय, औरंगाबाद यांचेकडे पाठविण्यासाठी जऊळकर यांनी 20 टक्क्यांप्रमाणे पैशांची मागणी केली. तडजोडी अंती 50 हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान तक्रारदार यांनी एसीबीकडे याबाबत तक्रार केली.

 

औरंगाबाद एसीबीच्या पथकाने पचासमक्ष पडताळणी केली असता दिलीप जऊळकर यांनी 20 टक्याप्रमाणे पैश्याची मागणी करून तडजोडीअंती 50 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य. अधिकाऱ्यांनी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना दिलीप जऊळकर याला रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole), अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe),
पोलीस उपअधीक्षक मारुती पंडित (DySP Maruti Pandit) यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद एसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप राजपूत (Police Inspector Sandeep Rajput)
पोलीस अंमलदार केवलसिंग गुसिंगे, रविंद्र काळे, चांगदेव बागुल यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Aurangabad ACB Trap | Anti-corruption arrests salary superintendent of welfare office while accepting bribe of 50 thousand rupees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

International Women’s Day | दलित महिला उद्योगविश्वात यशाचे शिखर गाठू शकतात – पद्मश्री मिलिंद कांबळे

Nandurbar Police – International Women’s Day | जागतिक महिला दिनानिमित्त नंदुरबार महिला पोलिसांची बाईक रॅली

Pune Crime News | कोयत्याने प्राणघातक हल्ला करुन फरार झालेल्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या