Aurangabad ACB Trap | कृषी सेवा केंद्राचा मासिक हप्ता देण्यासाठी लाचेची मागणी, कृषी अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – कृषी सेवा केंद्राचा मासिक हप्ता व कृषी दुकानाचा मासिक तपासणीचा अनुकूल अहवाल कृषी अधीक्षक यांना पाठवण्यासाठी 4 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) औरंगाबाद पंचायत समिती मधील कृषी अधिकाऱ्याला (Agriculture Officer) औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Aurangabad ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. अशोक रघुनाथ खेडकर Ashok Raghunath Khedkar (वय 50) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. औरंगाबाद एसीबीने (Aurangabad ACB Trap) ही कारवाई शुक्रवारी (दि.3) केली.
याबाबत 28 वर्षाच्या व्यक्तीने औरंगाबाद एसीबीकडे (Aurangabad ACB Trap) तक्रार केली आहे. अशोक खेडकर हे खुलताबाद पंचायत समितीमध्ये कृषी अधिकारी असून त्यांच्याकडे औरंगाबाद पंचायत समितीचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. तक्रारदार यांच्या कृषी सेवा केंद्राचा मासिक हप्ता व कृषी दुकानाचा मासिक तपासणीचा अनुकूल अहवाल कृषी अधीक्षक यांना पाठवण्यासाठी अशोक खेडकर यांनी 9 जानेवारी रोजी 5 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती 4 हजार हजार रुपये देण्याचे ठरले होते.
तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली होती. त्यावेळी खेडकर यांनी तक्रारदार यांना लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. शुक्रवारी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून चार हजार रुपये लाच घेताना कृषी अधिकारी अशोक खेडकर यांना रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole), अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe),
पोलीस उपअधीक्षक मारुती पंडित (DySP Maruti Pandit)
यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद एसीबीचे पोलीस उप अधीक्षक दिलीप साबळे (DySP Dilip Sable), पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर (Police Inspector Nandkishore Kshirsagar),
पोलीस निरीक्षक हनुमंत वारे (Police Inspector Hanumant Vare), पोलीस हवालदार बाळासाहेब थोरात, पोलीस नाईक भीमराव जीवडे,
महिला पोलीस नाईक पुष्पा दराडे यांच्या पथकाने केली.
Web Title :- Aurangabad ACB Trap | Demand for bribe to pay monthly installment of Krishi Seva Kendra, Agriculture officer in anti-corruption net
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
MLA Bachchu Kadu | ‘मंत्रिमंडळ विस्तार केला नाही तर…’, बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा
Vanita Kharat | वनिता खरातच्या उखाण्याने वेधले सर्वांचे लक्ष; म्हणाली “सुमित तूच माझा महाराष्ट्र…”