Aurangabad ACB Trap | फिर्यादीला मॅनेज करण्यासाठी 50 हजार आणि जेवणासाठी दीड हजार रुपये लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासह पोलीस पाटलावर एसीबीकडून FIR

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – विनयभंगाच्या गुन्ह्यात फिर्यादी यांना मॅनेज करुन मदत मिळवून देण्यासाठी 50 हजार रुपये आणि जेवणासाठी दीड हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासह पोलीस पाटलावर औरंगाबाद एसीबीने (Aurangabad ACB Trap) गुन्हा दाखल केला आहे. औरंगाबाद एसीबीच्या पथकाने (Aurangabad ACB Trap) सोमवारी दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) औरंगाबाद ग्रामीणच्या बिडकीन पोलीस ठाण्यात (Bidkeen Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

 

बिडकीन पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक विजय पवार आणि डोंगरुनाईक तांडा येथील पोलीस पाटील गुलाब छगन चव्हाण असे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत 40 वर्षीय व्यक्तीने औरंगाबाद एसीबीकडे (Aurangabad ACB Trap) तक्रार केली होती.

 

तक्रादार यांच्यावर बिडकीन पोलीस ठाण्यात विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील फिर्यादी यांना मॅनेज करणे व गुन्ह्यात मदत मिळवून देण्यासाठी 80 हजार रुपये लाचेची मागणी (Demanding Bribe) केली होती. तडजोडीअंती 50 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तसेच जेवणासाठी दोन हजार रुपये तात्काळ फोन पे करण्यास सांगून तडजोडीअंती दीड हजार रुपये लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांनी औरंगाबाद एसीबीकडे तक्रार केल्यानंतर पथकाने पडताळणी केली.
पडताळणीमध्ये पोलीस पाटील यांनी दाखल गुन्ह्यात तपासी अंमलदार यांच्याकडून मदत मिळवून
देण्यासाठी तडजोडीची लाचेची रक्कम ठरवण्यासाठी मध्यस्थी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार सोमवारी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole),
अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe),
पोलीस उपअधीक्षक साबळे (DySP Sable)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर (Police Inspector Nandkishore Kshirsagar),
पोलीस अंमलदार राजेंद्र जोशी, भूषण देसाई, दिगंबर पाठक यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Aurangabad ACB Trap | FIR filed by ACB on police station with policeman demanding bribe of Rs 50,000 to manage complainant and Rs 1,500 for food

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ajit Pawar | गायरान प्रकरणावरुन अजित पवार आक्रमक, म्हणाले-‘अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा’

Income Tax Alert! जर बहुतांश व्यवहार कॅशने करत असाल तर व्हा अलर्ट, येऊ शकते नोटीस, जाणून घ्या नियम

Fixed Deposit | ७०० दिवसाच्या एफडीवर ही बँक देते ७.६०% व्याज, जाणून घ्या डिटेल्स